दोन दिवस पडणार ताऱ्यांचा पाऊस, दर तासाला पडणार १००० उल्कापिंड!

172

तुम्ही कधी ताऱ्यांचा पाऊस पडलेला पाहिला आहे का? जगभरातील अंतराळ प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. पुढचे दोन दिवस आकाशात ताऱ्यांचा पाऊस होणार असल्याचे सांगितले जात आहे. अमेरिकेची अंतराळ संस्था नासाने दिलेल्या माहितीनुसार, ३० आणि ३१ मे रोजी हरक्युलिल्ड उल्कापिडांचा पाऊस पृथ्वीवर पडणार आहे. गेल्या २० वर्षांनंतर पहिल्यांदाच उल्कापिंड आकाशात चमकताना दिसणार आहे. असेही सांगितले जात आहे की, या उल्कापिंडांचा पाऊस एका धूमकेतूमुळे होणार असल्याचेही नासाने स्पष्ट केले आहे. हा पाऊस नेमका का पडणार आहे ? भारतात हे दिसणार का? या मागील शास्त्रीय कारणे नेमकी काय? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

(हेही वाचा – IRCTC Indian Railway: लांब पल्ल्यांच्या रेल्वे गाड्यांचे डबे लाल, निळे, हिरवेच का असतात? वाचा उत्तर)

भारतात उल्कापिंडांचा पाऊस दिसणार?

धूमकेतू अनेक भागात विभागला गेला असून ३१ मे रोजीच्या रात्री दर तासाला १ हजार उल्कापिंडांचा पाऊस होणार आहे, असे नासाने सांगितले आहे. जर धूमकेतूतील धूळ वेगळी होण्याची गती कमी झाली असेल उल्कापिंडांचा पाऊस होणार नाही. नासाने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी सकाळी साडेदहाच्या सुमारास उल्कापिंड पृथ्वीच्या दिशेने गतीने येताना दिसतील. भारतात दिवस असल्याने अंतराळप्रेमींना हा वर्षाव पाहता येणार नाही. त्यामुळे त्याच्यात नाराजीचे वातावरण पसरली आहे. अमेरिका, कॅनडा, मॅक्सिको, लॅटिन अमेरिकेत हा पाऊस पर्वणी ठरणार आहे. मात्र भारतीयांना यू ट्यूबवर याचे लाईव्ह प्रक्षेपण पाहता येणार आहे.

धूमकेतू हा बर्फ आणि धुळीपासून तयार होत असून त्याचा आकार शेपटीसारखा असतो. सूर्याभोवती धूमकेतूचे भ्रमण सुरू असते. जेव्हा धूमकेतू पृथ्वीच्या कक्षेत जवळ येतो, तेव्हा पृथ्वीवरील गुरूत्वाकर्षणामुळे धूमकेतूच्या तुकड्यांना पृथ्वीकडे खेचण्यास सुरूवात करते. हे तुकडे पृथ्वीच्या वातावरणात ज्यावेळी येतात तेव्हा त्यांना आग लागते, अशावेळी आकाशात मोठा प्रकाश पाहायला मिळतो. त्यावेळी उल्कापिंडाचा पाऊस पडतोय असे म्हटले जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.