मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्यांच्या पायावर कधी शस्त्रक्रिया होणार याकडे साऱ्याचे लक्ष लागून राहिले होते. आज राज ठाकरेंवर होणाऱ्या शस्त्रक्रियेची तारीख निश्चित झाली असून ते उद्या लिलावतीमध्ये दाखल होणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे यांना पायाचा त्रास होत आहे. यासाठी राज ठाकरे यांच्यावर ही शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. पायाचा त्रास होत असल्याने त्यांनी अयोध्या दौराही स्थगित केला होता.
१ जून रोजी होणार शस्त्रक्रिया
मिळालेल्या माहितीनुसार, राज ठाकरे यांच्यावर १ जून रोजी शस्त्रक्रिया होणार असून या शस्त्रक्रियेनंतर त्यांना दोन महिन्यांची सक्तीची विश्रांती घ्यावी लागणार आहे. त्यामुळे येते दोन महिनेतरी आयोध्या दौरा किंवा भोंदा वाद-विवाद काहिसे थंडावण्याची चिन्हे आहेत. १ जून रोजी होणाऱ्या शस्त्रक्रियेसाठी राज ठाकरे उद्या लिलावतीमध्ये दाखल होणार आहे.
… म्हणून केला अयोध्या दौरा स्थगित
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा ५ जून रोजी अयोध्या दौरा होणार होता. पण हा दौरा रद्द करण्याची घोषणा राज ठाकरे यांनी केली. तूर्तास अयोध्या दौरा स्थगित करण्यात येत असल्याचे ट्वीट करत राज ठाकरे यांनी ही घोषणा केली. मे महिन्याच्या अखेरीस किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात ही शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून शक्यता वर्तवण्यात येत होती. त्यामुळेच राज ठाकरे यांचा हा अयोध्या दौरा तूर्तास रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात येत होते.
Join Our WhatsApp Community