मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींना न्यायलयीन कोठडी

119

मुंबईतील 1993 च्या साखळी बॉम्बस्फोटातील 4 आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या आरोपींना आज, सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले. यापूर्वी 23 मे रोजी सीबीआयने त्यांना न्यायालयात हजर केले, त्यानंतर आरोपींना 7 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली होती. अबू बकर, युसूफ भक्त, शोएब बाबा आणि सय्यद कुरेशी अशी आरोपींची नावे असून, या चारही आरोपींना गुजरात एटीएसने अटक केली होती, त्यानंतर सीबीआयने त्यांना ताब्यात घेतले होते.

आरोपींना 14 दिवसांची कोठडी

या आरोपींना सीबीआयने न्यायालयात हजर केले होते. त्यावेळी या सर्व आरोपींना सा दिवसांची कोठडी सुनावण्यात आली होती. त्याची मुदत आज संपत असल्याने त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायालयाने आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

(हेही वाचा – राज ठाकरेंवर लिलावतीत ‘या’ तारखेला होणार शस्त्रक्रिया)

… त्यांनतर झाली सर्वांना अटक

या चौघांना बनावट पासपोर्टच्या संशयावरून ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर आरोपींकडे सविस्तर चौकशी केली असता, ते 1993 च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील वॉन्टेड आरोपी असल्याचे समोर आले त्यांनतर या सर्वांना अटक करण्यात आली, असे गुजरात एटीएसच्या डीआयजींनी सांगितले. मुंबईतील या साखळी बॉम्बस्फोटात विविध ठिकाणी 257 जणांचा मृत्यू झाला होता, तर 713 जण जखमी झाले होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.