गेल्यावर्षी वाशिष्ठी आणि शिव नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने संपूर्ण चिपळूणमध्ये पूरस्थिती निर्माण झाली. सोसायटी, घरांमध्ये पाणी शिरल्याने हजारो नागरिक पाण्यात अडकले, भूस्सखलन होऊन रस्ते खचले, सरकारी मालमत्ता, शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यासाठी युद्धपातळीवर मदतकार्य सुरू करण्यात आले, हजारो लोक बेघर झाले. यानंतर स्थानिकांच्या मागण्या, त्यांची सुरक्षितता, पूरस्थिती का निर्माण झाली याची कारणे लक्षात घेण्यापेक्षा चिपळूण नगरपरिषदेने पावसाळ्याच्या आधी चिपळूण येथील गेल्यावर्षी महापुरात अडकलेल्या चिपळूण शहर, बाजारपेठ, एसटी स्टँड या भागातील इमारती, घरे, दुकानदार या सर्वांना नोटीस पाठवली आहे.
( हेही वाचा : ‘बेस्ट’ फेरी पुन्हा सुरू करा! प्रशासनाकडे पत्राद्वारे मागणी )
४ महिने स्थलांतरित होण्याचे आदेश
पूरस्थितीवर उपाययोजना करण्यापेक्षा घरे रिकामे करून ४ महिने इतरत्र राहायला जा, अन्यथा जे होईल त्याला तुमची जबाबदारी असेल, असे चिपळूण नगपरिषदेने म्हटले आहे. शहरातील एसटी स्टँड शिवाजीनगर येथे हलवले जाणार आहे. प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयावर स्थानिक नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आम्हाला पुन्हा वाऱ्यावर सोडणार का, आमचे भरले संसार सोडून जाणार कुठे, मागील महापुरानंतर वर्षभरात आम्ही पुन्हा आमचे वैभव उभे केले आहे. आता ते सोडून आम्ही कुठे जाणार असा सवाल चिपळूणमधील दुकानदारांनी प्रशासनाला केला आहे. नगर परिषदेने आधीच नद्यांचे खोलीकरण केले आहे. त्यामुळे यंदा पुराचे पाणी साचणार नाही असा दावा केला जात आहे.
Join Our WhatsApp Community