आता कश्मीर ते कन्याकुमारी करा रेल्वेने प्रवास, भारतीय रेल्वेचा मोठा प्रकल्प लवकरच होणार पूर्ण

167

भारतीय रेल्वेचा उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे लिंक(USBRL)प्रकल्प लवकरच पूर्ण होणार असल्याचे भारतीय रेल्वेकडून सांगण्यात आले आहे. यामुळे आता थेट काश्मिरपर्यंत रेल्वेने जाण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. या प्रकल्पाच्या कामासाठी भारतीय रेल्वेकडून एप्रिल 2023 पर्यंतची डेडलाईन देण्यात आली आहे.

या नव्या रेल्वे मार्गाचे विशेष आकर्षण म्हणजे या मार्गावरील रेल्वे ट्रॅक आणि प्लॅटफॉर्म हे कुतूबमिनार पेक्षाही जास्त उंचीवर उभारण्यात येणार आहेत. इतक्या उंचावरुन रेल्वे धावणं हे कुठल्याही चमत्कारापेक्षा कमी नसल्याचे म्हटले जात आहे.

(हेही वाचाः IRCTC Indian Railway: लांब पल्ल्यांच्या रेल्वे गाड्यांचे डबे लाल, निळे, हिरवेच का असतात? वाचा उत्तर)

आयफेल टॉवरपेक्षाही उंच पूल

एकूण 272 कि किमी.च्या या मार्गाच्या पहिल्या टप्प्यातील 111 किमी.चे काम जोरदार सुरू असल्याचे उत्तर भारतीय रेल्वेचे जनरल मॅनेजर आशुतोष गांगल यांनी सांगितले. जम्मू-काश्मीरमधील रियासी जिल्ह्यात चिनाब नदीवर हा कमानी पूल(Arch Bridge) उभारण्यात आला आहे. तब्बल 359 मी.(1 हजार फूट) उंचावर असलेल्या पुलाची लांबी 1.3 किमी. आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे पॅरिसमधील जगप्रसिद्ध आयफेल टॉवरपेक्षाही हा पूल 30 मी. उंच आहे. असे वैशिष्ट्य असणारा हा जगातील पहिलाच पूल ठरला आहे.

FalakQureshi 1491333951566512129 20220209 142136 img1

(हेही वाचाः RBI कडून FD च्या नियमात मोठा बदल! जर मॅच्युरिटीनंतर पैसे काढले नाहीत तर…)

सर्वात लांब बोगदा

फेब्रुवारी महिन्यात उत्तर रेल्वेला सर्वात लांब बोगदा तयार करण्यात यश आले आहे. कतरा ते बनिहाल सेक्शन दरम्यान हा 12.758 किमी.चा हा सर्वात लांब बोगदा असणार आहे. या मार्गावर 100 किमी. प्रति तास या वेगाने रेल्वे धावणार असल्याचे भारतीय रेल्वेकडून सांगण्यात येत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.