रुपाली चाकणकर यांना 24 तासांत जीवे मारण्याची धमकी

132

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना जीवे मारण्याची धमकी आल्याची माहिती समोर येत आहे. एका अज्ञान व्यक्तीने फोन करुन पुढच्या 24 तासांत मारण्याच्या धमकी रुपाली चाकणकर यांना दिली आहे. या धक्कादायक प्रकरणामुळे आता राज्यात चांगलीच खळबळ उडाली आहे.

अज्ञात व्यक्तीकडून फोन

राष्ट्रीय महिला आयोगाच्या दिल्ली येथील कार्यालयात चाकणकर यांना एका अज्ञात व्यक्तीकडून हा धमकीचा फोन आला आहे. रविवारी दुपारच्या सुमारास हा फोन आला असून, त्यामागचे कारण अजून स्पष्ट झालेले नाही. तसेच ती व्यक्ती कोण आहे याचाही अजून तपास लागलेला नसून, अहमदनगर येथून हा फोन आल्याची माहिती मिळत आहे.

याआधीही दोन वेळा धमकी

रुपाली चाकणकर यांना याआधीही धमकीचे फोन करण्यात आले होते. 26 डिसेंबर 2020 रोजी चाकणकर यांच्या सिंहगड रोडवरील कार्यालयाला आग लावण्याची धमकी देण्यात आली होती. तसेच तुमचा कार्यक्रम करू, अशा शब्दांतही फोन करुन रुपाली चाकणकर यांना धमकावण्यात आले होते.

रुपाली चाकणकर या राष्ट्रवादी काँग्रेसच्या धडाडीच्या महिला कार्यकर्त्या म्हणून ओळखल्या जातात. महिलांचे प्रश्न सोडवण्यात त्यांचा पुढाकार आहे. त्यामुळेच त्यांना राज्य महिला आयोगाचे अध्यक्षही करण्यात आलं आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.