पुण्याजवळील शिवे येथे स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहाचे उद्घाटन

205

राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान कोलकाता ह्यांच्या आर्थिक सहाय्यातून कै. रामचंद्र महादेव गडदे स्मृती वाचनालय शिवे अंतर्गत स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह उद्घाटन सोहळा व स्वातंत्र्यवीर सावरकर तैलचित्र अनावरण सोहळा २८ मे रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीदिनी शिवे येथे संपन्न झाला.

यावेळी खेड तालुक्याचे आमदार दिलीपशेठ मोहिते पाटील व हिताची अस्टेमो फाय प्रा. लि.चे हेड श्रीकांत मापारी ह्यांच्या शुभहस्ते स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहाचे उद्घाटन व तैलचित्राचे अनावरण करण्यात आले. आंतरराष्ट्रीय चित्रकार महादेवजी गोपाळे यांनी हे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे तैलचित्र रेखाटले आहे. यावर्षी कै. रामचंद्र महादेव गडदे स्मृती वाचनालयाचं रौप्य महोत्सवी वर्षाचं औचित्य साधून स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहाचे उद्घाटन करण्यात आले.

New Project 8 17

स्वातंत्र्यवीर सावरकर युवा मंडळ, शिवे या संस्थेच्या माध्यमातून अनेक कार्यक्रम हाती घेण्यात आले आहेत. दरवर्षी या संस्थेकडून सर्व जाती-धर्मातील जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात येतो. विशेष म्हणजे हा सोहळा पूर्णपणे मोफत असून यात जोडप्यांना 10 हजार रुपयांच्या गृहउपयोगी वस्तू आणि भारतमातेची प्रतिमा देण्यात येते. तसेच याच संस्थेशी संलग्न असलेल्या कै. रामचंद्र महादेव गडदे स्मृती वाचनालयाकडून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या हिंदुत्ववादी विचारांचा प्रसार व प्रचार करण्याचं कार्य करण्यात येतं.

अखंड भारत दिनी शिवे गावच्या पश्चिमेकडील गावापासून पूर्वेकडील गावापर्यंत एक ज्योत यात्रा काढली जाते. त्याचप्रमाणे महिलांसाठी विविध प्रशिक्षण शिबिरे देखील भरवण्यात येतात. महिलांना उद्योगशील बनवण्यासाठी विविध उद्योगांचे प्रशिक्षण या शिबिरांमध्ये महिलांना देण्यात येते. सावरकरांचा वैज्ञानिक दृष्टिकोन सर्वांपर्यंत पोहोचावा यासाठी अंधश्रद्धेच्या निर्मूलनासाठी कार्य करण्यात येते. तसेच सावरकरांचे विचार जास्तीत जास्त तरुणांपर्यंत पोहोचावेत यासाठी या संस्थेकडून गेली 25 वर्षे व्याख्यानमाला चालवण्यात येते. वाचन संस्कृती जपणं हा या वाचनालयाचा मुख्य हेतू आहे. तसेच रक्तदान शिबीर, विद्यार्थ्यांच्या निबंध स्पर्धा असे विविध कार्यक्रम घेण्यात येतात.

New Project 9 14

ज्यांच्या संकल्पनेतून आणि परिश्रमातून शिवे गावचे हे वैभव उभे राहिले ते खेड तालुका पंचायत समितीचे माजी सदस्य, माजी सरपंच, खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक आणि सर्व तरुण सहकाऱ्यांचे मार्गदर्शक, शिवे गावचे विकासपुरुष रोहिदासजी गडदे, वाचनालयाचे संस्थापक शंकरराव साळुंके, माजी सरपंच  नंदकुमार शिवेकर, माजी उपसरपंच, विद्यमान सदस्य विनायकराव शिवेकर, वाचनालयाचे अध्यक्ष संजयजी शिवेकर, ग्रंथपाल कुंडलिकराव गडदे, रामगिरबाबा नाट्य मंडळाचे अध्यक्ष नामदेवराव गडदे तसेच कै. रामचंद्र महादेव गडदे स्मृती वाचनालयाचे संचालक मंडळ, स्वातंत्र्यवीर सावरकर युवा मंडळाचे सर्व पदाधिकारी, समस्त ग्रामस्थ शिवे ह्यांच्या प्रयत्नातून हा उद्घाटन सोहळा संपन्न झाला.

कार्यक्रमाला विशेष उपस्थिती म्हणून कात्रज दूध संघाचे संचालक अरुणशेठ चांभारे, चाकण नगरीचे उपनगराध्यक्ष उद्योजक राजुशेठ गोरे, कॉर्निंग इंडियाचे सीएसआर प्रमुख अमित अभ्यंकर साहेब, मरेली मदर्सनचे सीएसआर प्रमुख पंकजजी मालवकर, ब्रिजस्टोनच्या सीएसआर प्रमुख निकिताजी गुलहाने, माजी उपसभापती सुरेशभाऊ शिंदे, रामगिरबाबा शिक्षण संस्थेचे अध्यख सचिनशेठ शिवेकर, खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा अध्यक्ष अमोलभाऊ पानमंद, उद्योजक रवींद्र चव्हाण, माजी सभापती रमेशशेठ राळे, माजी उपसभापती बन्सुशेठ होले, सामाजिक कार्यकर्ते दामुशेठ आहेरकर, मुंबई डब्बेवाला असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर तसेच पंचक्रोशीतील सरपंच, उपसरपंच, चेअरमन अनेक संस्था, राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.