राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांची राज्याच्या मुख्यमंत्री पदासाठी गेल्या काही दिवसांपासून चर्चा होत आहे. त्यातच सोमवारी पुढचा मुख्यमंत्री हा राष्ट्रवादीचा होऊ दे, असा नवस खुद्द सुप्रिया सुळे यांनी तुळजा भवानी चरणी केला. पण जर मुख्यमंत्री पदासाठी सुप्रिया सुळे यांच्या नावाची चर्चा होत असेल, तर रश्मी ठाकरे देखील यासाठी सज्ज आहेत, असे विधान शिवसेना आमदार अब्दुल सत्तार यांनी केले आहे. त्यांच्या या विधानामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
(हेही वाचाः ‘पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा होऊ दे…’, सुप्रिया सुळेंचे आई भवानीला साकडे)
काय म्हणाले सत्तार?
राज्याच्या मुख्यमंत्रीपदी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच राहावेत अशी विनंती सर्वांनी केली आहे. त्यामुळे सुप्रिया सुळे कधी मुख्यमंत्री होतील, कोणत्या परिस्थितीत होतील याबाबत मी आता काहीही भाष्य करणार नाही. पण त्यांच्या नावाची जर मुख्यमंत्री पदासाठी चर्चा होत असेल तर आमच्या रश्मीताई देखील सज्ज आहेत. त्यांचाही राजकारणाचा दाणगा अभ्यास आहे. त्यामुळे हे पद सांभाळण्यास त्या सक्षम असल्याचे अब्दुल सत्तार यांनी म्हटले आहे.
याआधीही केला होता उल्लेख
आमदार अब्दुल सत्तार यांनी याआधीही रश्मी ठाकरे यांचे नाव राज्याच्या मुख्यमंत्री पदासाठी घेतले होते. विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठीच्या दुखण्यामुळे मंत्रालयात हजेरी लावता येत नव्हती. त्यावेळीही रश्मी ठाकरे या राज्याचे मुख्यमंत्रीपद सांभाळू शकतात, असं विधान सत्तार यांनी केले होते.
(हेही वाचाः रुपाली चाकणकर यांना 24 तासांत जीवे मारण्याची धमकी)
Join Our WhatsApp Community