एकाच खोलीतून चालवल्या 550 बनावट कंपन्या; 800 कोटींचा जीएसटी गैरव्यवहार

133

केवळ सहा लोक बसतील इतक्या लहान खोलीत तब्बल 550 पेक्षा अधिक बनावट कंपन्या तयार करुन त्यामार्फत कोट्यावधी रुपयांचा जीएसटी इनपुट घोटाळा केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. गुजरातमधील सूरत शहरात हा प्रकार घडला. 800 कोटींचा घोटाळा करण्यासाठी खोलीत केवळ 4 टेबल आणि खुर्च्या ठेवण्यात आल्या होत्या. या घोटाळ्याप्रकरणी आतापर्यंत 5 जणांना अटक करण्यात आली आहे.

या प्रकरणी तपासाशी संबंधित एका वरिष्ठ अधिका-याने सांगितले की, सूरतमधील एका खोलीतून सुमारे 550 डमी कंपन्या ही टोळी चालवत होती. त्यांच्यामार्फत कोट्यवधी रुपयांचा फसवणुकीचा व्यवसाय केला जात होता. या खोलीतून केवळ चार टेबल आणि खुर्च्या ठेवलेल्या आढळल्याचे अधिका-याने सांगितले.

( हेही वाचा: आर्यन खानला क्लीन चिट मिळाल्यानंतर, समीर वानखेडेंची चेन्नईला ट्रान्सफर )

घोटाळ्याचे कनेक्शन गुजरात, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश

गरीब घरातील रोजंदारीवर जाणा-या मजुरांपासून ते मध्य प्रदेशच्या पोलीस महासंचालक पदावरुन निवृत्त झालेल्या आयपीएस अधिका-यांपर्यंतचे नाव आणि घराचे कागदपत्र डमी कंपन्या उघडण्यासाठी बेकायदेशीरपणे वापरण्यात आले. आपल्या कागदपत्रांच्या आधारे कोट्यवधी रुपयांचा फसवणुकीचा धंदा केला जात असल्याची माहिती या लोकांना नव्हती, असे अधिका-यांनी सांगितले. या टोळीकडून डमी कंपन्यांच्या तपशिलांसह मोठ्या प्रमाणात दस्ताऐवज, मोबाईल फोन, सीमकार्ड, सील, लेटर- पॅड आदी साहित्या जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा सविस्तर तपास विविध सरकारी यंत्रणांकडून सुर असून, टोळीने अनेक ठिकाणी फसवणूक केल्याची शक्यता आहे. त्यामुळे घोटाळ्यांची संख्या वाढू शकते.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.