पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज राम मंदिर भूमिपूजन कार्यक्रम पार पडला असून, सर्वत्र सध्या मोदींचे कौतूक होत आहे. मात्र नरेंद्र मोदी यांचा एक फोटो सध्या जोरदार व्हायरल होत असून, आता यावरून काँग्रेसने मोदींवर जोरदार टीका केली आहे. काँग्रेस नेते शशी थरूर यांनी ट्विट करून या फोटोवर जोरदार टीका केली आहे.
ना प्रेम सीखा है, ना त्याग सीखा है
ना करुणा सीखी है, ना अनुराग सीखा है
खुद को राम से बड़ा दिखाकर, खुश होने वालो तुमने
श्री राम चरित मानस का कौन सा भाग सीखा है?#AyodhyaRamMandir https://t.co/ijCXms02Ar— Shashi Tharoor (@ShashiTharoor) August 5, 2020
काय म्हणाले थरूर
“नाही प्रेम शिकलात, नाही त्याग शिकला, ना करूणा घेतली, ना अनुराग शिकलात स्वतःला रामापेक्षा मोठं दाखवून खुश होणाऱ्यांनो, तुम्ही श्री राम चरित मानसमधील कोणता भाग शिकला आहात?,” असे शशी थरूर यांनी म्हटलं आहे.
मर्यादा पुरुषोत्तम भगवान राम सर्वोत्तम मानवीय गुणों का स्वरूप हैं। वे हमारे मन की गहराइयों में बसी मानवता की मूल भावना हैं।
राम प्रेम हैं
वे कभी घृणा में प्रकट नहीं हो सकतेराम करुणा हैं
वे कभी क्रूरता में प्रकट नहीं हो सकतेराम न्याय हैं
वे कभी अन्याय में प्रकट नहीं हो सकते।— Rahul Gandhi (@RahulGandhi) August 5, 2020
राहुल गांधी यांचे देखील ट्विट
दरम्यान भूमिपूजनाच्या सोहळ्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देखील ट्विट करत त्यांनी प्रभु रामचंद्रांच्या गुणांचे वर्णन केले आहे. “मर्यादा पुरूषोत्तम भगवान राम सर्वोच्च मानवीय गुणांचं स्वरूप आहे. राम आपल्या मनात खोलवर बसलेल्या मानवतेची मूळ भावना आहे. राम प्रेम आहे. ते कधीच द्वेषातून प्रकट होऊ शकत नाही. राम करूणा आहे. ते कधी क्रूरपणे प्रकट होऊ शकत नाही. राम न्याय आहे. ते कधी अन्यायातून प्रकट होऊ शकत नाही,” असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
Join Our WhatsApp Community