राज्याचे परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांच्या संबंधित मालमत्तांवर ईडीने धाडी टाकल्यानंतर, आता किरीट सोमय्या यांनी या प्रकरणात ट्वीट करत, व्यावसायिक विभास साठे यांना सुरक्षा पुरवण्याची मागणी केली आहे. या संदर्भातले पत्र किरीट सोमय्यांनी महाराष्ट्र पोलीस महासंचालकांना लिहिले आहे.
शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी संबंधित 7 ठिकाणी ईडीने 26 मे रोजी छापेमारी केली होती. यामध्ये दापोलीतील रिसाॅर्टची कथित विक्री अनिल परब यांना करणारे विभास साठे यांच्या निवासस्थान आणि कार्यालयाचाही समावेश होता. त्यामुळे त्यांचा मनसुख हिरेन होऊ नये, यासाठी त्यांना सुरक्षा द्या, अशी मागणी करणारे पत्र किरीट सोमय्या यांनी लिहिले आहे.
( हेही वाचा :सुप्रिया सुळेंची चर्चा होत असेल, तर रश्मी ठाकरेही मुख्यमंत्री पदासाठी सज्ज! शिवसेना आमदाराचे विधान )
Anil Parab "Resort Ghotala" investigation action going on. Parab had bought land from Vibhas Sathe.
Let Vibhas Sathe case not become another "Mansukh Hiran"
I requested Maharashtra Police to provide security to Vibhash Sathe. @BJP4India @Dev_Fadnavis pic.twitter.com/r77JdGnCwa
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) May 31, 2022
काय लिहिलेय पत्रात
अनिल परब यांनी मे 2017 मध्ये विभास साठे यांच्याकडून दापोलीतील मुरुड समुद्र किना-यावरील जमीन घेतली. तसेच, फ्राॅड, चिटिंग करुन तिथे रिसाॅर्ट बांधला. अनिल परब हे विभास साठेंवर दडपण आणणार आहेत, म्हणून आम्हाला भीती वाटते की विभास साठे यांचे मनसुख हिरेन होऊ नये आणि हे पाहण्याची जबाबदारी महाराष्ट्र पोलिसांची आहे. विभास साठे यांच्या जिवाला धोका लक्षात घेऊन त्यांच्या सुरक्षेची व्यवस्था महाराष्ट्र पोलिसांनी करावी, अशी विनंती सोमय्यांनी पत्राद्वारे पोलीस महासंचालकांकडे केली आहे.
Join Our WhatsApp Community