राऊत आगलावे; ठाकरेंनंतर छत्रपतींच्या घरात आग लावली, नितेश राणेंचा राऊतांवर हल्लाबोल

143

उद्धव आणि राजे ठाकरे यांच्यात आग लावणारे संजय राऊत आता छत्रपतींच्या घरातही आग लावत असल्याचा, आरोप भाजपचे आमदार नितेश राणे यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना केला.

संजय राऊत यांचा आग लावण्याचा धंदा आहे. उद्धव आणि राज यांच्यात त्यांनीच भांडणे लावली. त्यानंतर ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी राऊतांची गाडीही जाळली होती. या दोन भावांमध्ये भांडणे लावल्यानंतर आता ते छत्रपती घराण्यातही आग लावत आहेत. दहा मिनिटे त्यांचे सुरक्षा रक्षक बाजूला काढा आणि मग मराठा समाजाने त्यांचा ताबा घेतला पाहिजे, असेही राणे म्हणाले.

( हेही वाचा :‘अल- कायदा’ची काश्मीरवर वक्रदृष्टी; संयुक्त राष्ट्राचा अहवाल, भारताची चिंता वाढणार )

पाठीत खंजीर खुपसला

अतिक्रमाणाबाबत मुंबई महापालिकेची नोटीस मिळाली आहे. त्याला कायदेशीर उत्तर देऊ, असेही त्यांनी स्पष्ट केले. पाठीत खंजीर खुपसून, देवेंद्र फडणवीसांना फसवून नगरपालिका असेल किंवा राज्यात सत्तेत लोक बसले आहेत. सेना भाजपचे सरकार सत्तेत येईल, त्याला तुम्ही मोदींचा फोटो लावा, तुमचा फोटो लावा आणि एकत्र राज्य आणू असा शब्द उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना दिला. सत्ता आल्यानंतर, शब्द न पडू देणारे मुख्यमंत्री राज्यात बसलेत. काॅंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मदतीने ते मुख्यमंत्री झाले आणि अडीच वर्ष ते राज्य करताहेत, असे ते म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.