Bmc election 2022 : कोणत्या प्रभागांचे काय आरक्षण पडले जाणून घ्या

156

मुंबई महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीकरता प्रभागांचे आरक्षण जाहीर करण्यात आले असून यामध्ये अनुसूचित जाती व जमाती महिलासह सर्वसाधारण महिला या प्रवर्गाकरता आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल आणि अतिरिक्त आयुक्त संजीव कुमार यांचया उपस्थितीत वांद्रे रंगशारदा सभागृहात ही सोडत पार पडली. उपायुक्त संजोग कबरे यांच्यासह सहायक आयुकत(निवडणूक) विश्वास मोटे यांनी योग्यप्रकारे नियोजन करत ही लॉटरी सोडत पार पाडली.

( हेही वाचा : महापालिका कर्मचाऱ्यांनो व्यसनापासून दूर रहा: प्रशासनाने केले आवाहन)

सर्वसाधारण महिला प्रवर्गांसाठी प्राधान्य क्रम एकमध्ये ५३ जागा या सन २००७, २०१२ व २०१७च्या निवडणुकीत महिला आरक्षित न झाल्याने महिला आरक्षित म्हणून घोषित करण्यात आल्या, तर २००७च्या निवडणुकीत सर्वसाधारण महिलांकरता राखीव असलेले मात्र २०१२ व २०१७च्या निवडणुकीत महिला राखीव न झालेले प्रभाग हे प्राधान्य क्रम २ मध्ये ३३ प्रभाग आरक्षित करण्यात आले. तर प्राधान्य क्रमांक ३मध्ये ६३ प्रभागांमधून २३ प्रभाग हे सोडत पध्दतीने जाहीर करण्यात आले आहे. महिलांचे ११८ प्रभाग जाहीर केले असून उर्वरीत सर्व प्रभाग हे खुले प्रवर्ग म्हणून घोषित करण्यात आले आहे.

यामध्ये अनुसूचित जमाती महिला : प्रभाग क्रमांक १२४ (खुला प्रवर्ग ५५)

अनुसूचित जाती महिला (०८): १३९,१९०,१९४,१६५,१०७,८५,११९,२०४

अनूचित जाती खुला प्रवर्ग :६०,१५३,१५७,१६२,२०८,२१५,२२१

सर्वसाधारण महिला प्रवर्ग :

२,१०,२१,२२,२३,२५,३३,३४,४९,५२,५४,५७,५९,६१,८६,९०,९५,९८,१००,१०४,१०६,१०९,१११,११८,१२१,१२२,१३४,१४४,१४५,१५०,१५६,१५९,१६९,१७०,१७१,१७२,१७५,१७८,१८२,१८४,१८९,१९१,१९२,२०१,२०२,२०५,२०७,२१२,२१३,२१८,२२९,२३०,२३६,०५,२८,२९,३९,४५,४६,६४,६७,६९,७४,८०,९२,१०३,१२०,१२५,१३१,१४२,१४७,१५१,१६३,१६८,१७७,१८१,१८६,१८७,१९६,२२०,२२५,२२६,२२७,२३१,२३३,२३४,४४,१०२,७९,११,५०,१५४,१५५,७५,१६०,८१,८८,९९,१३७,२१७,१४६,१८८,१४८,९६,०९,१८५,१३०,२३२,५३

उर्वरीत सर्व प्रभाग हे खुले असे गणले जाणार आहे

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.