रेल्वे प्रवास अचानक रद्द झालाय? तुमचे तिकीट दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर असे करा Transfer

157

भारतीय रेल्वेचे जाळे संपूर्ण देशभर पसरलेले आहे. त्यामुळे अनेक लोक रेल्वे प्रवास करण्यास प्राधान्य देतात. परंतु अनेकवेळा कन्फर्म तिकीट असून सुद्धा इतर कामामुळे आपल्याला आपले तिकीट रद्द करावे लागते. अशावेळी जर तुम्ही प्रवास करू शकत नसाल तर तुम्ही हे तिकीट तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला किंवा अन्य व्यक्तीला ट्रान्सफर करू शकता. या सुविधेबद्दल विस्तृत माहिती आपण जाणून घेऊया…

( हेही वाचा : मुंबई-पुणे प्रवास होणार आणखी जलद! अंतर ६ किलोमीटरने होणार कमी)

  • तुमचे आरक्षण केलेले तिकीट प्रवास रद्द झाला तरी कुटुंबातील अन्य व्यक्ती याचा लाभ घेऊ शकतात. वडील, आई, भाऊ, बहिण, मुलं, पती/पत्नी यांच्या नावावर तुम्ही तिकीट ट्रान्सफर करू शकता.
  • यासाठी प्रवाशांना रेल्वे सुटण्याच्या २४ तास आधी विनंती करावी लागेल. यानंतर तिकिटावर असलेल्या ज्या प्रवाशाचे नाव असेल ते कमी करून नव्या सदस्याच्या नावावर तिकीट हस्तांतरित केले जाते.

तुमचे तिकीट दुसऱ्यांच्या नावावर हस्तांतरित कसे कराल ? ( railway ticket transfer)

  • तिकिटाची प्रिंट काढा.
  • जवळच्या रेल्वे स्टेशनच्या आरक्षण काऊंटरला भेट द्या.
  • ज्यांच्या नावावर तिकीट ट्रान्सफर करायचे आहे, त्याचे ओळखपत्र जसे की आधारकार्ड, मतदानकार्ड ही ओळखपत्रे सोबत ठेवा.
  • आरक्षण काऊंटरवर तिकीट हस्तांतरणासाठी अर्ज करा.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.