अनुसूचित जातीचे प्रभाग बनले अनूसूचित जमाती

122

मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत अनूसूचित जमातीसाठी असलेल्या दोन प्रवर्गापैंकी एक प्रभाग महिला राखीव करण्यात आला आहे. प्रभाग क्रमांक १२४ हा प्रभाग महिला राखीव झाला असून प्रभाग क्रमांक ५५ हा जमातीच्या खुल्या प्रवर्गासाठी राखीव करण्यात आला आहे. विशेष म्हणजे महिला राखीव झालेला हा प्रभाग अनूसूचित जातीकरता आरक्षित होता, तर खुला झालेला प्रवर्गही मागील निवडणुकीत महिला अनूसूचित जातीकरता राखीव होता. मागील निवडणुकीत अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेले दोन्ही प्रभाग आता सर्वसाधारण महिला राखीव बनले आहेत.

( हेही वाचा : Bmc election 2022 : कोणत्या प्रभागांचे काय आरक्षण पडले जाणून घ्या)

प्रभाग क्रमांक १२४ हा अनुसूचित जमातीकरता महिला राखीव झाल्याने मागील निवडणुकीत या प्रभागातून शिवसेनेच्या चंद्रावती मोरे या निवडून आल्या होत्या. तर जमातीच्या खुल्या प्रवर्गासाठी राखीव करण्यात आलेल्या नवीन ५५ प्रभागातून शिवसेनेच्या रेखा रामवंशी या निवडून आल्या होता. परंतु हे दोन्ही प्रभाग आता अनुसूचित जमातीकरता अनुक्रमे महिला व पुरुष प्रवर्गासाठी राखीव झाले आहेत.

( हेही वाचा : या नेत्यांना दिला महिलांनी दे धक्का!)

तर मागील निवडणुकीत अनुसूचित जमातीच्या महिला प्रवर्गातून वर्सोव्यातील प्रभाग क्रमांक ५९मधून शिवसेनेच्य प्रतिमा खोपडे आणि प्रभाग ९९ मधून शिवसेनेचे संजय अगलदरे हे निवडून आले होते. परंतु हे दोन्ही प्रभाग आता सर्वसाधारण महिला वर्गासाठी राखीव झाले आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.