मुंबई वाहतूक पोलिसांचा ‘नो हॉंकिंग डे’ हॉर्न वाजले, की चलन कापले!

127

मुंबई शहरातील गजबजलेल्या रस्त्यावर बुधवारी दिवसभर कुठल्याही वाहनांचा हॉर्न ऐकू येणार नाही, ज्या वाहन चालकाने हॉर्न वाजवला की त्याचे चलन कापले म्हणून समजा. मुंबई वाहतूक पोलिसांकडून दर बुधवारी दिवसभर मुंबईत ‘नो हॉंकिंग डे’ ही विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. जेष्ठ नागरिक, विद्यार्थी, रुग्ण, स्थानिक नागरिक यांना होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाच्या त्रासाबद्दल मुंबई वाहतूक पोलीस शाखेकडून एक दिवसासाठी ही विशेष मोहीम राबिवली जाणार आहे.

‘नो हॉंकिंग डे’

मुंबई हे अतिशय गजबजलेले शहर आहे. या शहराची लोकसंख्या जसजशी वाढत आहे, तशी वाहनांच्या संख्येत देखील प्रचंड वाढ होत आहे. वाढत्या वाहनांमुळे शहरात मोठ्या प्रमाणात वाहतुकीची समस्या निर्माण झाली. वाढत्या वाहनांमुळे ध्वनी प्रदूषण देखील तेवढ्याच प्रमाणात वाढले असून या ध्वनी प्रदूषणाचा सर्वाधिक त्रास जेष्ठ नागरिक, रुग्ण आणि विद्यार्थी वर्गाला होत आहे. त्यात काही वाहन चालकांनी आपल्या वाहनांना विचित्र आवाजाचे हॉर्न लावल्यामुळे ही समस्या आणखीनच बिकट झालेली आहे. शहरात विनाकारण हॉर्न वाजवणारे महाभाग मोठ्या प्रमाणात आहे. आठवड्यातून एक दिवस तरी शहर वाहनांच्या हॉर्नपासून मुक्त करण्यासाठी मुंबई वाहतूक विभागाकडून ‘नो हॉंकिंग डे’ ही विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.

( हेही वाचा : मुंबईतील ४० विद्यमान नगरसेविका प्रभाग आरक्षणातच पास)

प्रत्येक बुधवारी ही विशेष मोहीम मुंबईत राबिवली जाणार आहे, मुंबईतील सर्व वाहतूक विभागातील पोलीस अधिकारी हे त्यांच्या हद्दीतील प्रत्येक बुधवारी पूर्ण दिवस नो हॉंकिंग डे चे आयोजन करतील. त्यामध्ये नो हॉंकिंगचे फलक, बॅनर बनवून सिग्नलवर थांबलेल्या वाहन चालकांना दाखविण्यात येतील. त्याचबरोबर नो हॉंकिंगबाबत मेघा माईकवरून वाहन चालकांचे मार्गदर्शन व समुपदेशन केले जाईल. वाहतूक नियमभंग करणाऱ्या वाहन चालकांवर कायद्याची जरब असावी याकरीता नो हॉंकिंग या वाहतूक नियमाचे उल्लंघन करणाऱ्या जास्तीत जास्त वाहन चालकांवर चलन कारवाई करण्याचे आदेश प्रत्येक वाहतूक विभागाला देण्यात आलेले आहे.

नो हॉकिंग डे संबंधी कोणतीही शंका असल्यास वाहतूक नियंत्रण कक्ष येथे कार्यान्वित असलेल्या ८४५४९९९९९९ या हेल्प लाईन क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन वाहतूक विभागाकडून करण्यात आले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.