अलिकडे प्रत्येकाकडे एटीएम कार्ड (ATM)असते, अनेकजण कॅशलेस पेमेंट किंवा एटीएममधून Cash Withdraw करण्यासाठी एटीएम कार्डचा वापर करतात. ATM कार्ड हरवले किंवा चोरी झाल्यास प्रत्येकाच्या मनात धास्ती निर्माण होते परंतु अशावेळी अजिबात चिंता न करता तुम्ही तुमचे एटीएम कार्ड ऑनलाइन ब्लॉक करू शकता
तुम्ही स्टेट बॅंक ऑफ इंडियाचे ग्राहक असाल आणि तुमचेही एटीएम कार्ड हरवले किंवा चोरी झाले तर तुम्ही खालील स्टेप्स फॉलो करून तुमचे ATM कार्ड ऑनलाइन ब्लॉक करू शकता.
( हेही वाचा : लालपरी 1 जूनला होणार 75 वर्षांची)
या स्टेप्स फॉलो करा…
- सर्वात आधी तुम्हाला www.onlinesbi.com वर जावे लागेल. त्यानंतर Personal Banking ऑप्शनमध्ये लॉगइनवर क्लिक करुन username आणि Password टाका.
- यानंतर E-Service टॅब मध्ये एटीएम कार्ड सर्विसवर क्लिक करून Block ATM Card ऑप्शनची निवड करा.
- यानंतर तुमचे डेबिट कार्ड ज्या अकाऊंटवरून लिंक आहे त्यावर क्लिक करा.
- आपल्या कार्डला सिलेक्ट करा. आपले एटीएम कार्ड ब्लॉक करून सबमिट बटनवर क्लिक करा यानंतर आपले डिटेल्स व्हेरिफाय करा आणि Confirm बटनवर क्लिक करा.
- ओटीपी किंवा प्रोफाइल पासवर्ड टाका. यानंतर तुमचे डेबिट कार्ड ब्लॉक होईल.