पुढील शैक्षणिक वर्षापासून 2023-24 राज्यातील व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश देताना, बारावी आणि सीईटीच्या प्रत्येकी 50 टक्के गुणांचा विचार करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे सीईटीची संख्या कमी करुन प्रवेश प्रक्रिया 1 जुलैपासून सुरु करण्याचे नियोजन करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे उच्च तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी दिली.
काय म्हणाले उदय सामंत?
उदय सामंत म्हणाले की, सीईटी सेलकडून राज्यातील विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी सीईटी परीक्षा घेण्यात येतात. त्यामुळे विद्यार्थ्यांचे संपूर्ण लक्ष सीईटीवर केंद्रित झाले असून, बारावीच्या वर्गांमध्ये विद्यार्थीच नसल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमिवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार झालेल्या बैठकीत पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी बारावी आणि सीईटीच्या गुणांना प्रत्येकी 50 टक्के महत्त्व देण्याच्या निर्णयांपर्यंत आलो आहोत. साधारण 2012 मध्ये या पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबवण्यात आली होती, असे उदय सामंत म्हणतात.
( हेही वाचा: 7 वर्षांनंतर केंद्र सरकारच्या दोन विमा योजनांच्या प्रीमियम दरांमध्ये 1 जूनपासून बदल )
निर्णय का?
विद्यार्थ्यांचे संपूर्ण लक्ष सीईटीवर केंद्रित झाले असून, बारावीच्या वर्गामध्ये विद्यार्थीच दिसत नाहीत. बारावीच्या गुणांवरुन व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी आत्तापर्यंत प्रवेश मिळत नव्हत्या. त्यामुळे येत्या शैक्षणिक वर्षापासून बारावी आणि सीईटी यांचे समसमान गुण प्रवेशासाठी ग्राह्य धरण्यात येणार आहेत.
Join Our WhatsApp Community