रशिया-युक्रेन युद्धादरम्यान महागाईशी झगडणाऱ्या लोकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सार्वजनिक क्षेत्रातील तेल आणि गॅस कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत १३५ रुपयांची कपात केली आहे. मात्र, घरगुती एलपीजीच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. नवे दर बुधवारपासून लागू झाले आहेत.
जाणून घ्या नवे दर
तेल कंपन्यांनी व्यावसायिक गॅसच्या किमतीत कपात केल्यानंतर, राजधानी दिल्लीत 19 किलोचा गॅस सिलिंडर आता 2 हजार 354 रुपयांऐवजी 2 हजार 219 रुपयांना मिळणार आहे. कोलकात्यात त्याची किंमत आता 2 हजार 454 रुपयांवरून 2 हजार 322 रुपये प्रति सिलेंडरवर आली आहे. मुंबईत 2 हजार 306 रुपयांऐवजी 2 हजार 171.50 रुपयांना उपलब्ध होईल, तर चेन्नईमध्ये त्याची किंमत 2 हजार 507 रुपयांऐवजी 2 हजार 373 रुपयांपर्यंत खाली आली आहे.
( हेही वाचा: ‘सीईटी’ बाबत मोठी घोषणा; व्यावसायिक अभ्याक्रमांसाठी बारावी आणि सीईटीच्या गुणांना 50-50 टक्क्यांचे महत्त्व)
मागच्या दोन महिन्यांत अनेकदा किमती वाढल्या होत्या
व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती गेल्या दोन महिन्यांत अनेक वेळा वाढल्या होत्या. मार्चमध्ये राजधानी दिल्लीत 19 किलो एलपीजी सिलिंडरची किंमत 2 हजार 012 रुपये होती. 1 एप्रिल 2022 रोजी त्याची किंमत प्रति सिलेंडर 2 हजार 253 रुपये करण्यात आली. यानंतर 1 मे रोजी त्याची किंमत 102 रुपयांनी वाढवण्यात आली, त्यानंतर व्यावसायिक सिलेंडरची किंमत 2 हजार 354 रुपये झाली.
Join Our WhatsApp Community