पुणतांबा येथील शेतक-यांनी पुन्हा एकदा एल्गार पुकारला आहे. पुणतांब्यात बुधवारपासून पाच दिवसांचे धरणे आंदोलन सुरु होणार आहे. राज्यातील शेतक-यांच्या विविध समस्यांवर शेतक-यांचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन पुकारण्यात आले आहे.
पाच वर्षांपूर्वी, 2017 मध्ये पुणतांब्यातील शेतक-यांनी एक जूनपासून शेतकरी संपाची हाक दिली होती. त्यानंतर राज्यातील इतर शेतकरी संघटना या आंदोलनात उतरल्याने राज्यात तत्कालीन भाजप सरकारविरोधात शेतकरी आंदोलनाचा वणवा पेटला होता. आता त्याच पुणतांब्यातून शेतक-यांनी आंदोलन सुरु केले आहे.
( हेही वाचा : तुमची ऑनलाइन फसवणूक झालीय? विमा काढा, निर्धास्त राहा )
कोणत्या मागण्यांसाठी आंदोलन
- ऊसाला एकरी एक हजार रुपये अनुदान द्यावे.
- शिल्लक ऊसाला हेक्टरी दोन लाख रुपये द्यावे.
- कांद्यासह प्रती क्विंटल 500 रुपये अनुदान द्यावे.
- शेतक-यांना दिवसा पूर्ण आणि सुरळीतपणे वीज मिळावी.
- थकित विजबिल माफ झाले पाहिजे.
- कांदा आणि गव्हाची निर्यात बंदी उठवावी.
- सर्व पिकांना आधारभूत किंमत दिली जावी त्यासाठी आयोगाची स्थापना करुन निर्णय द्यावा.
- 2017 साली केलेल्या कर्जमाफीची प्रत्यक्ष अंमलबजावणी करावी.
- दुधाला ऊसाप्रमाणे एआरपी लागू केला जावा.
- दुधाला कमीतकमी चाळीस रुपये दर दिला जावा.
- खाजगी दूध संकलन केंद्रात होणारी लूट थांबवावी.
- वन्य प्राण्यांमुळे नुकसान झाल्यास भरपाई दिली जावी.
- शेतकरी आंदोलनात दाखल गुन्हे मागे घेतले जावे.
- वन हक्क कायद्यानुसार आदिवासींच्या जमिनी त्यांच्या नावावर केल्या जाव्यात.