एसटी महामंडळाद्वारे जेष्ठ नागरिक आणि इतर सवलतधारांना स्मार्ट कार्ड देण्यात येत आहे. जेष्ठांच्या स्मार्ट कार्ड योजनेला 31 मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. आता 30 जूनपर्यंत म्हणजेच एक महिन्याची अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे. एसटी महामंडळाने त्याबाबत परिपत्रक काढून विभाग नियंत्रकांना तसे आदेश दिले आहेत.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आणि एसटी कर्मचा-यांनी केलेल्या संपामुळे आगार तसेच विभागीय कार्यालयात स्मार्ट कार्ड नोंदणीकरण व वितरण प्रक्रिया वेळेत पूर्ण होऊ शकली नाही. त्यामुळे जेष्ठांना स्मार्ट कार्ड घेण्यासाठी 30 जूनपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. 1 जुलैपासून एसटी महामंडळात स्मार्ट कार्ड अनिवार्य राहणार आहे.
( हेही वाचा :मोठी बातमी: सिलेंडर 135 रुपयांनी स्वस्त )
स्मार्ट कार्डचे आवाहन
प्रत्येक आगारातील जेष्ठ नागिरकांनी स्मार्ट कार्ड तातडीने काढून घ्यावे, एसटी आगार प्रशासनाने जेष्ठांना स्मार्ट कार्ड वितरित करुन कोणत्याही लाभार्थीचे स्मार्ट कार्ड शिल्लक राहणार नाही, याची काळजी घ्यावी अशा सूचना एसटीने केल्या आहेत.
Join Our WhatsApp Community