भाजप कोल्हापुरातील पूरग्रस्तांसाठी आक्रमक; तुटपुंजी मदतही मिळालेली नाही, चंद्रकांत पाटीलांचा निशाणा

133

कोल्हापूर येथील पूरग्रस्तांच्या प्रश्नासाठी भाजप आज आक्रमक झाले असून भाजपाकडून टाहो मोर्च्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी या आंदोलनाचे नेतृत्व भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी करत असताना ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. ज्यावेळी फडणवीस सरकार होते तेव्हा त्यांच्या काळात पूरग्रस्तांना तातडीने मदत पोहोचवली होती. मात्र ठाकरे सरकारकडून २०२१ मध्ये तुटपूंजी मदत जाहीर झालेले नाही. असे असतानाही ऐन पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कोणतीही ठोस पावले उचलेले नाही. त्यामुळे येत्या पावसाळ्यासाठी ठाकरे सरकारने काय तयारी केली आहे, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केल्याचे समोर आले आहे.

(हेही वाचा – लेजेंडरी Deccan Queen ला 92 तर Punjab Mail एक्स्प्रेसला 110 वर्षे पूर्ण!)

काय म्हणाले चंद्रकांत पाटील?

देवेंद्र फडणवीस यांचे सरकार असताना कोल्हापूरमध्ये अचानक पूर आला तेव्हा १५ दिवस हेलिकॉप्टर नागरिकांच्या मदतीसाठी उभे होते. यावेळी पूरग्रस्तांना बचावण्यासाठी एनडीआरएफच्या तुकड्या तात्काळ उपलब्ध करण्यात आल्या होत्या. सांगलीतील एका गावातील बोट उलटली ही घटना सोडली तरी एकही बळी या महापुरात गेलेला नव्हता. कित्येक लोकांचे जीव त्याकाळी फडणवीस सरकारच्या नियोजनामुळे वाचले होते. प्रशासन आणि सरकारही ही मोठी ताकद असते, असेही पुढे चंद्रकांत पाटील म्हणाले.

कोल्हापुरात मंगळवारी होत असलेल्या या टाहो आंदोलनात कोल्हापूरातील कुंभार समाज मोठ्या संख्येने उपस्थित झाला होता. त्यांनी प्रशासनाकडे गणपती तयार करण्यासाठी जमीन उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूर शहरातील दसरा चौकातून या आंदोलनाला सुरूवात झाली असून कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता यावेळी भाजपची आक्रमक भूमिका पाहायला मिळाली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.