बॉलिवूड गायक कृष्णकुमार कनाथ उर्फ केके यांचे निधन झाले आहे. पण त्यांच्या मृत्यूचे गुढ वाढले आहे. कोलकात्याच्या न्यू मार्केट पोलीस ठाण्यात त्यांच्या अनैसर्गिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. केके यांच्या डोक्यावर आणि चेह-यावर जखमांचे निशाण आढळल्याने, केके यांच्या मृत्यूप्रकरणी आयोजक आणि हाॅटेल कर्मचा-यांची चौकशी केली जात आहे.
केके यांच्या मृत्यूचे गूढ वाढले
दिलीप घोष यांनी राज्य सरकारसमोर काही प्रश्न उपस्थित केले आहेत. ज्या पद्धतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला ती पद्धत योग्य नाही, याची चौकशी झाली पाहिजे, असे ते म्हणाले. काॅन्सर्ट दरम्यान तिथला एसी बंद होता, तसेच गर्दीदेखील होती. क्षमतेपेक्षा जास्त गर्दी तेथे होती. या कारणामुळे त्यांची तब्येत बिघडली की काय, हे माहित नाही, कारण कार्यक्रमामध्ये लोकांमध्ये एक्साइटमेंट असते.
( हेही वाचा: एसटी महामंडळाच्या ‘शिवाई’ला अजित पवारांचा हिरवा कंदील; सर्व बसेसचे विद्युतीकरण करण्यासाठी प्रयत्नशील )
बॉलिवूड गायक कृष्णकुमार कनाथ उर्फ केके यांचे मंगळवारी निधन झाले. 53 वर्षीय केके यांनी मंगळवारी कोलकाता येथील नजरुल मंच येथे महाविद्यालयीन कार्यक्रमात सादरीकरण केले होते. त्यानंतर केके हॉटेलमध्ये गेले आणि तिथे ते बेशुद्ध पडले. त्यांना तातडीने कोलकाता येथील सीएमआरआय रुग्णालयात नेण्यात आले, तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले.
Join Our WhatsApp Community