मोहित कंबोज यांना दिलासा, अटकपूर्व जामीन मंजूर

116

आर्थिक गुन्हे शाखेने मुंबईत भाजप नेते मोहित कंबोज यांच्यावर बुधवारी गुन्हा दाखल केला होता. त्यांच्या कंपनीने तब्बल ५२ कोटींचे कर्ज बुडवल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली होती. दरम्यान, मुंबई सत्र न्यायालयाने दिलासा देत मोहित कंबोज यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून केला जात आहे.

काय आहे प्रकरण

गेल्या काही दिवसांपासून मोहित कंबोज यांचे नाव चर्चेत आहे. २०११ ते २०१५ या दरम्यान मोहित कंबोज यांच्या कंपनीने इंडियन ओव्हरसिज बँकेकडून ५२ कोटींचे कर्ज घेतले होते. परंतु हे पैसे ज्या कारणाकरता घेतले होते. परंतु, हे पैसे ज्या कारणासाठी घेतले होते. त्याऐवजी इतरत्र वळवण्यात आळे नंतरच्या काळात मोहित कंबोज यांच्या कंपनीने हे कर्ज बुडवले होते. यामुळे कंबोज आणि दोन संचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

कंबोज यांनी आरोप फेटाळले

मोहित कंबोज म्हणाले की, माझ्या विरोधात मुंबई पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे. एक जुनी कंपनी जी २०१७ ला बंद झाली आहे. त्याचे बॅंक इश्यू काढून माझ्यावर गुन्हा दाखल केला आहे. महाविकास आघाडी सरकार असे वागून माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. पण तसे होणार नाही. हे नवाब मलिक वा संजय राऊत यांचे काम असेल तर मी यांच्याविरोधात कायदेशीर लढा देईन. आम्ही याला घाबरणार नाही, असे म्हणत कंबोज यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.