राज्यात ओमायक्रॉनच्या विषाणूमुळे पुन्हा रुग्णसंख्या वेगाने वाढण्याचा क्रम सातत्याने वाढत आहे. बुधवारी राज्यात १ हजार ८१ नव्या रुग्णांची नोंद झाल्याने आता राज्यात ४ हजार ३२ कोरोना रुग्णांवर उपचार दिले जात आहे. रुग्ण बरे होण्याचा टक्काही आता सातत्याने कमी होत ९८.०७ टक्क्यांवर आला आहे. रुग्ण बरे होण्याच्या तुलनेत दुप्पटीने रुग्ण सापडत असल्याची नोंद सध्या दर दिवसाला राज्यातील आरोग्य विभाग करत आहे.
(हेही वाचा – अनिल देशमुखांच्या अडचणी वाढणार? सचिन वाझे माफीचा साक्षीदार )
नव्या रुग्ण नोंदीत एकट्या मुंबईत ७३९ कोरोनाचे रुग्ण सापडलेत. नव्या रुग्णसंख्येचा भार मुंबईतच प्रामुख्याने दिसत आहे. त्यात यंदाच्या आठवड्यापासून पन्नास टक्क्यांहून जास्त रुग्ण केवळ मुंबईत सापडत आहेत. ठाण्यात ५९, पुण्यात ७० नव्या रुग्णांची नोंद आरोग्य विभागाने केली.
राज्यात नव्या १ हजार ८१ रुग्णांच्या तुलनेत ५२४ रुग्णच केवळ बरे होऊन घरी परतले. आता मुंबईत २ हजार ९७०, ठाण्यात ४५२ तर पुण्यात ३५७ कोरोनाच्या रुग्णांवर उपचार दिले जात आहे. मृत्यूदर आटोक्यात असल्याने घाबरु नका, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
Join Our WhatsApp Community