पगाराच्या मुद्द्यावर आरोग्यसेविका ठाम; संप सुरूच

151

मुंबईत दर दिवसाला सातशेच्यावर कोरोनाचे रुग्ण आढळलेले असताना बुधवारपासून पालिकेच्या अंतर्गत येणा-या ४ हजार आरोग्यसेविका बेमुदत संपावर गेल्या आहेत. आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी पालिका प्रशासनाकडून आंदोलनकर्त्या संघटनेला पुन्हा चर्चेसाठी बोलावले गेले. मात्र किमान पगार मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नाही, अशी ठाम भूमिका संघटनेच्यावतीने घेतली गेली. मंगळवारी पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांच्याशी आरोग्य सेविका संघटनेची बैठक होईल, असे सूत्रांकडून समजले.

( हेही वाचा : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना खुशखबर! जूनमध्ये मिळणार DA थकबाकीची रक्कम?)

पावसाळा जवळ येत असताना मुंबईतील पावसाळी आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आरोग्यसेविकांना वेगवेगळी कामे दिली जातात. अशातच आरोग्य सेविकांचा संप पालिका प्रशासनासाठी मोठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. आम्ही न्यायालयीन मागण्यांवर ठाम आहोत. हक्काचा पगार, मूलभूत सुट्ट्या तसेच निवृत्तीनंतर पेन्शन या मागण्या निश्चितच हक्काच्या आहेत. पालिका प्रशासनाने तब्बल १०० हून अधिक आरोग्यसेविकांकडून कंत्राटीकरणावर आधारित कर्मचारी वर्ग असे कागदोपत्री लिहून घेतले आहे. यामुळे आरोग्यसेविका सोयीसुविधांपासून वंचित राहत असल्याची खंत महापालिका आरोग्यसेवा कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष प्रकाश देवदास यांनी व्यक्त केली.

आरोग्य सेविकांचे काम

सध्या आरोग्य सेविकांना लहान मुलांच्या लसीकरणाची माहिती सोपवली होती. पावसाळी आजारांची माहिती व नियंत्रण कार्यक्रमांसाठी आवश्यक प्रशिक्षण त्यांचे सुरु होणार आहे. मात्र त्याअगोदरच ४ हजार आरोग्यसेविका बेमुदत संपावर गेल्या.

या योजना राबवण्यासाठी आरोग्यसेविका कामे करतात

इंद्रधनुष मिशन, पल्स पोलिओ, जंतुनाशक गोळ्या, अ जीवनसत्त्व डोस, रोगप्रतिबंधत मोहिम, प्रधानमंत्री मातृवंदना योजना लाभ, कुटुंबनियोजन, बाल माता संगोपन, लसीकरण मोहिम, स्वच्छ भारत अभियान, माझे कुटुंब माझी जबाबदारी, क्षयरोग, स्वाईनफ्लू, कुष्ठरोग निर्मूलन, प्रधानमंत्री आयुष्यमान योजना, जनगणना, पशुगणना ,आर्थिक गणना

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.