कोरोना काळाअगोदर दोन वर्षांपूर्वी निवृत्त झालेल्या ६५ वर्षीय आरोग्यसेविकेला मुलाने सोडले, पेन्शन योजना नसल्याने तिला आता कांदिवली स्थानकावर राहण्याची वेळ आली आहे. आझाद मैदानात किमान वेतनासाठी एल्गार पुकारणा-या आरोग्यसेविकांना साथ देण्यासाठी त्या स्वतःहून आझाद मैदानात आल्या होत्या. मी आता जगू कशी, असा प्रश्न विचारताना त्यांना अश्रू अनावर झाले होते.
( हेही वाचा : पगाराच्या मुद्द्यावर आरोग्यसेविका ठाम; संप सुरूच)
हीच सरकारला हात जोडून विनंती आहे
सरस्वती (६५) असे या वृद्ध महिलेचे नाव आहे. रात्रीच्या वेळी त्यांना व्यवस्थित दिसतही नाही. त्यांना कुटुंबियांकडून रस्त्यावर सोडले गेले. ९२ सालापासून मी आरोग्यसेविकेचे काम केले. वयाच्या ६३ व्या वर्षी निवृत्त झाले. मला पेन्शन द्यावी, हीच सरकारला हात जोडून विनंती आहे, असे त्या सतत रडून सांगत होत्या. पेन्शन मिळेल, या आशेवर मी आहे, जेणेकरुन जगणे सुखकर होईल, असेही त्यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community