नव्या पॅन कार्डसाठी घरबसल्या करा अर्ज

145

पॅनकार्ड ( Pan Card) हे अत्यंत महत्वाच्या सरकारी कागदपत्रांपैकी एक आहे. आर्थिक व्यवहारांशी संबंधित कोणत्याही कामकाजात पॅनकार्ड हे उपयोगी आहे. आधार, रेशन कार्डाप्रमाणे तुमच्याकडे पॅनकार्ड असणे सुद्धा महत्वाचे असते. परंतु तुमच्याकडे जर पॅनकार्ड नसेल तर अजिबात चिंता करू नका तुम्ही अगदी घरबसल्या पॅन कार्डसाठी अर्ज करू शकता. पॅनकार्ड रजिस्ट्रशेन प्रक्रिया सोपी आहे जाणून घ्या ही संपूर्ण प्रक्रिया…

( हेही वाचा : सेवानिवृत्त आरोग्यसेविकेवर भीक मागायची वेळ )

पॅन कार्ड अर्ज करण्यासाठी खालील Steps फॉलो करा…

  • घरबसल्या पॅन कार्डसाठी अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या. https://www.onlineservices.nsdl.com/paam/endUserRegisterContact.html
  • आता तुमचे नाव, जन्मतारीख, ई-मेल, मोबाइल नंबर याची सविस्तर माहिती भरा. त्यानंतर continue with the pan application form या पर्यायावर क्लिक करा. नव्या पेजवर तुमचे डिजिटल ई-केवायसी डिटेल्स भरा.
  • फिजिकल पॅन कार्ड हवे की नाही नमूद करून आधार कार्डचे शेवटचे ४ आकडे भरा. आता तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती भरावी लागेल यानंतर महत्वाची कागदपत्रे अपलोड करून डिक्लेरेशन बॉक्सवर टिक करा. तुम्हाला जर फॉर्ममध्ये कोणताही बदल करायचा नसल्यास Proceed पर्यायावर क्लिक करा.
  • पेमेंट continue पर्यायवर क्लिक करून Authentication process पूर्ण करा. e-kyc केल्यावर तुमच्या मोबाईलवर ओटीपी येईल.
  • ओटीपी व्हेरिफायकरून Continue with esign पर्यायावर क्लिक करा. आता तुम्हाला तुमचा मोबाईल क्रमांक टाकावा लागेल. ओटीपी व्हेरिफाय झाल्यावर तुम्हाला acknowledgement slip मिळेल. या स्टेप्स फॉलो करून तुम्ही नवीन पॅन कार्डसाठी अर्ज करू शकता.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.