वंचित बहुजन आघाडीला भाजपच्या कोणत्या नेत्याने आणि कुठे पैसे दिले त्याचे पुरावे देऊन चंद्रकांत खैरे यांनी आरोप करावे, अन्यथा, मानहानीच्या खटल्यासाठी तयार रहावे, असा इशारा वंचित बहुजन आघाडीने दिला होता. वंचितकडून चंद्रकांत खैरे यांच्याविरोधात आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. त्यानंतर आता चंद्रकांत खैरे यांनी वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर यांना पत्र लिहून भूमिका मांडली आहे.
( हेही वाचा: Lakhimpur kheri case: साक्षीदारावर गोळीबार )
काय म्हटलंय पत्रात
जालना येथे चार दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात भाजपने एमआयएम व वंचितला एक हजार कोटी रुपये दिल्याचे वक्तव्य केले होते. परंतु मी हे वक्तव्य एमआयएमला उद्देशून केले होते. यात वंचित बहुजन आघाडीचे नाव अनावधानाने घेतले, असं चंद्रकांत खैरे म्हणाले. वंचितबाबत मी हे वक्तव्य मागे घेत आहे. माझे वक्तव्य एमआयएमसाठी होते, ते कायम आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या भावना दुखावण्याचा माझा उद्देश कदापि नव्हता, तरी पुन्हा या पत्रकाद्वारे खुलासा करत आहे, असे चंद्रकांत खैरे यांनी म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community