J&k: काश्मिरी पंडितांच्या हत्येनंतर आता हिंदू बॅंक मॅनेजरची हत्या

117

Target Killing in Jammu- Kashmir: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये दहशतवाद्यांनी एका बँक मॅनेजरला लक्ष्य केले आहे. यावेळी दहशतवाद्यांनी राजस्थानमध्ये राहणा-या हिंदू बँक मॅनेजरची गोळ्या झाडून हत्या केली. या दहशतवादी हल्ल्यात बँक मॅनेजर विजय कुमार यांची प्रकृती चिंताजनक होती आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील आरेह गावात दहशतवादी गुरुवारी एका बँकेत घुसले. तेथे त्याने बँक मॅनेजरवर गोळी झाडून घटनास्थळावरून पळ काढला.

( हेही वाचा: काश्मिरी पंडितांचा आक्रोश या सरकारला दिसत नाही; राऊतांचा केंद्रावर निशाणा )

टार्गेट किलिंगच्या घटनांमध्ये वाढ

जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काश्मीरमध्ये गेल्या काही महिन्यांत टार्गेट किलिंगच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवादी मोठ्या शस्त्रांऐवजी लहान शस्त्रे (पिस्तूल) वापरतात. गेल्या काही दिवसांपासून काश्मिरी पंडित आणि हिंदूंना सातत्याने लक्ष्य केले जात आहे.

काश्मिरी पंडितांचा इशारा 

काश्मिरी पंडितांनी रस्त्यावर उतरत आम्हाला न्याय द्या अशी घोषणाबाजी केली. दरम्यान, प्रशासनाने आगामी 24 तासांत सुरक्षित स्थळी स्थलांतर  न केल्यास काश्मीर खोरे सोडण्याचा इशाराही काश्मिरी पंडितांनी दिला. काश्मिरी पंडितांच्या इशा-यानंतर जम्मू- काश्मीर प्रशासनाने पंडितांना संक्रमण शिबिरात ठेवले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.