मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथे जून महिन्यात जापानसारखे पॉड हॉटेल तयार करण्यात आले आहे. 50 जण राहू शकतील एवढी या हाॅटेलची क्षमता आहे. पश्चिम रेल्वेच्या मुंंबई सेंट्रल स्थानकानंतर आता मध्य रेल्वेवर पाॅड हाॅटेल उभारण्यात आले आहे. लांब पल्ल्याच्या ट्रेनमधून प्रवास करणा-या प्रवाशांसाठी आता हाॅटेल शोधण्याची गरज नाही. येथे राहण्यासाठी 12 तासांचे केवळ 500 रुपये मोजावे लागणार आहेत.
पर्यटकांना फायदा
हॉटेलमध्ये प्रत्येकी दोन लोकांच्या क्षमतेचे चार फॅमिली पॉड आहेत आणि 30 सिंगल पॉड आहेत. बाहेरून येणाऱ्या प्रवाशांसाठी पॉड हॉटेलची सुविधा खूप उपयुक्त ठरेल, कारण अनेक गाड्या सीएसएमटीला येतात. या हॉटेलचा फायदा अशा प्रवाशांना होईल ज्यांना मुंबईत फिरायचे आहे. पर्यटकांना आता इतर ठिकाणी जागा शोधण्याची गरज नाही.
( हेही वाचा: पाकिटात ११ किंवा १००१ असेच का दिले जातात? ही आहेत त्या वरच्या 1 रुपयामागची कारणे )
पाॅडमध्ये मिळणार या सुविधा
पाॅडमध्ये काॅमन एरियात मोफत काही वाय-फाय, लगेज रुम, प्रसाधनगृह, शाॅवर रुम, वाॅशरुम असतील, तर पाॅडच्या आत वैयक्तिक वापरासाठी टीव्ही, लहान लाॅकर, आरसा, एअर कंडिशनर आणि एअर फिल्टर व्हेंट्स, वाचनासाठी दिवे यासारख्या सुविधा असणार आहेत.
Join Our WhatsApp Community