रेल्वे पोलीस दलाने केली 150 महिलांची सुटका

148

भारतीय रेल्वेने महिलांची सुरक्षेला नेहमीच प्राधान्य दिले आहे. रेल्वे सुरक्षा दल (RPF) आणि रेल्वेत आघाडीवर काम करणारे कर्मचारी भारतीय रेल्वेने प्रवास करणाऱ्या महिलांची सुरक्षा होईल,हे सुनिश्चित करण्यासाठी अथक परिश्रम करत असतात. महिला सुरक्षेच्या या उद्दिष्टाला समर्पित असलेली “ऑपरेशन महिला सुरक्षा” मोहीम दिनांक 3 ते 31 मे 2022 दरम्यान संपूर्ण भारतात राबवण्यात आली. या मोहिमेदरम्यान आरपीएफने महिलांसाठी राखीव असलेल्या डब्यातून अनधिकृतपणे प्रवास करणाऱ्या 7 हजारांहून अधिक व्यक्तींना अटक केली आहे. तसेच, आरपीएफने 150 महिलांना मानवी तस्करीपासून वाचवले आहे.

आरपीएफ तुकड्यांना सकारात्मक प्रतिसाद 

रेल्वेने प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांना त्यांच्या संपूर्ण प्रवासासाठी अधिक संरक्षण प्रदान करण्याच्या उद्देशाने “मेरी सहेली” हा उपक्रम संपूर्ण भारतभर कार्यरत आहे. 283 प्रशिक्षित महिला अधिकारी आणि कर्मचारी असलेल्या या चमूने (223 स्थानके व्यापणारा ) विविध ठिकाणी दररोज सरासरी एकूण 1 हजार 125 महिला आरपीएफ कर्मचारी तैनात केले आहेत. ज्यांनी या कालावधीत 2 लाख 25 हजारांहून अधिक महिलांशी संवाद साधला आणि त्यांना पूर्णतः मदत केली. या काळात पुरुष आणि महिला आरपीएफ कर्मचा-यांच्या मिश्र तुकड्या असलेले ट्रेन एस्कॉर्ट देखील मोठ्या प्रमाणावर तैनात करण्यात आले होते. मिश्र तुकड्या काही महिन्यांपूर्वी सुरू झाल्या आहेत आणि त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.

( हेही वाचा: पाकिटात ११ किंवा १००१ असेच का दिले जातात? ही आहेत त्या वरच्या 1 रुपयामागची कारणे )

जीव धोक्यात घालून वाचवलेत प्राण 

रेल्वे प्रवास करणाऱ्यांना त्यांच्या प्रवासादरम्यान त्यांच्या सुरक्षिततेसाठी काय करावे आणि काय टाळावे, याबद्दल शिक्षित करण्यासाठी, 5742 मोहिमा आयोजित करण्यात आल्या होत्या. या महिनाभर चाललेल्या कार्यवाहीमध्ये, आरपीएफ जवानांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून, चालत्या ट्रेनमध्ये चढताना/ उतरताना घसरलेल्या आणि चालत्या ट्रेनखाली येण्याची शक्यता असलेल्या 10 महिलांचे प्राण वाचवले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.