मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हाती घेतलेले मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधातील आंदोलन थंडावल्यावर राज ठाकरे यांनी गुरुवारी, २ जून २०२२ रोजी ट्विट करत भोंग्यांचा विषय आता कायमचा संपवायचा आहे, असे म्हणाले आहेत.
काय म्हटले राज ठाकरे?
मशिदींवरील भोंग्यांच्या विषयाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हात घातल्यानंतर राज्यातलंच नव्हे तर देशातलं राजकारण ढवळून निघालं. आता हा विषय आपल्याला कायमचा संपवायचा आहे. त्यासाठी आपला विचार प्रत्येकापर्यंत पोहोचायलाच हवा. म्हणूनच माझं एक पत्र मराठी, इंग्रजी आणि हिंदी भाषेत आपल्या पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात आलं आहे. ते त्यांच्याकडून घ्या आणि कामाला लागा. तुम्ही एकच करायचं आहे माझं पत्र तुम्ही राहता त्या परिसरातील घराघरात स्वतः नेऊन द्यायचं आहे कारण व्यापक लोकसहभागाशिवाय आपलं हे आंदोलन यशस्वी होणार नाही. मला खात्री आहे; जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे पत्र पोहोचवण्याच्या कामात तुमच्याकडून जराही कुचराई होणार नाही.
महाराष्ट्र सैनिकांसाठी… pic.twitter.com/vCoubS5Aix
— Raj Thackeray (@RajThackeray) June 2, 2022
भोंग्यांचा विषयाचा असा होता घटनाक्रम!
- २ एप्रिल २०२२ – गुढीपाडव्याला छत्रपती शिवाजी महाराज उद्यान (शिवाजी पार्क) येथील सभेत पहिल्यांदा मशिदीवरील भोंगे खाली उतरवण्याचा आदेश
- १२ एप्रिल २०२२ – ठाण्याच्या उत्तर सभेत भोंग्याच्या विषयावर पुन्हा चर्चेला आणला
- १ मे २०२२ – औरंगाबाद येथील सभेत भोंगे उतरवण्यास ३ मे पर्यंतच्या अल्टिमेटमची आठवण करून दिली
- ३ मे २०२२ – मुंबई, ठाणे, नाशिकसह राज्यात मनसेकडून लाऊड स्पीकरवरून हनुमान चालीसा लावली
- २२ मे २०२२ – पुणे येथील सभेत भोंग्यांच्या आंदोलनावर भाष्य थोडक्यात केले