देशात प्रामुख्याने दक्षिण भारतात केळीच्या पानावर जेवण वाढले जाते. ओनम सारख्या सणादिवशी फक्त केळीच्या पानावरच जेवण वाढले जाते. परंतु केळीच्या पानावर जेवण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहिती आहेत का ? याविषयी जाणून घेऊया…
( हेही वाचा : मुंबई पोलीस Sunday Street उपक्रम; वांद्रे – वरळी Sea Link मार्गावर सायकल रॅली!)
केळीच्या पानावर जेवण्याचे फायदे
- दक्षिण भारतात आजही केळीच्या पानावर जेवले जाते. पाहुणे आले की त्यांनाही केळीच्या पानातच जेवण वाढलं जातं केरळ, तामिळनाडूमध्ये हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्येही केळीच्या पानावरच जेवण वाढले जाते. केळीच्या पानात अनेक खनिजे असतात. या खनिजांना पॉलीफेनॉल्स असे म्हटले जाते. हा गुणधर्म प्रामुख्याने ग्रीन टीमध्ये असतो. पॉलीफेनॉल्स हे नैसर्गिक अँण्टिऑक्सिडण्ट आहे असे आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. शरद कुलकर्णी यांनी सांगितले.
- केळीच्या पानात पदार्थ वाढल्यावर हे पदार्थ केळ्यातील पॉलीफेनॉल्स शोषून घेतात आणि जेवणाद्वारे हे घटक आपल्या शरीरात जातात. केळीच्या पानातील जीवाणूविरोधी घटकांमुळे आजारी पडण्याचा धोका कमी असतो.
- केळीच्या पानात जेवताना खास चव येते. केळीच्या पानावर सूक्ष्म थर असतो. हा थरच जेवणाला आणखी चविष्ट बनवतो. गरम जेवण जेव्हा केळीच्या पानात वाढले जाते तेव्हा हा थर वितळतो आणि तो पदार्थात समाविष्ट होऊन पदार्थांना विशिष्ट चव देतो.
- केळीच्या पानाचे लवकर विघटन होते तसेच केळीच्या पानावर जेवायला घेताना त्याची विशेष स्वच्छताही करावी लागत नाही. थोड्या पाण्याने स्वच्छ केली ही पाने स्वच्छ होतात.
- केळीचे पान आकाराने मोठे असल्यामुळे सर्व पदार्थ एकाचवेळी व्यवस्थित वाढले जातात.
- केळीच्या पानात जेवल्याने पोटाचे विकार जसे बद्धकोष्ठता, अपचन, गॅसेस होणे यासारख्या समस्या दूर होतात.