J&K Target Killing: पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला; परप्रांतीय मजूरांवर गोळीबार, एकाचा मृत्यू

165

मागच्या काही दिवसांपासून जम्मू काश्मीरमध्ये Target Killing सुर आहे. आता पुन्हा एकदा गुरुवारी बडगामध्ये वीटभट्टीवर काम करणा-या परप्रांतीय मजुरांवर हल्ला झाला. ज्यात एका मजूराचा मृत्यू झाला आहे. तर एक गंभीर जखमी असून सध्या रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

बडगाम मगरेपोरा चडूरा या भागात दहशतवाद्यांनी मजुरांवर हल्ला केला. या हल्ल्यात प्राण गमावलेल्या मजुराचे नाव दिलखुश असल्याचे सांगण्यात येत आहे. तो बिहारचा रहिवासी होता. दुस-या मजुराचे नाव राजन असून तो पंजाबचा रहिवासी आहे. काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून गैर काश्मिरी किंवा हिंदू नागरिकींची निवडक हत्या केली जात आहे.

बॅंक मॅनेजरची हत्या

गुरुवारी कुलगाममध्ये दहशतवाद्यांनी एका बँक मॅनेजरला लक्ष्य केले. राजस्थानमध्ये राहणा-या हिंदू बँक मॅनेजरची गोळ्या झाडून हत्या केली. या दहशतवादी हल्ल्यात बँक मॅनेजर विजय कुमार यांची प्रकृती चिंताजनक होती आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील आरेह गावात दहशतवादी गुरुवारी एका बँकेत घुसले आणि बँक मॅनेजरवर गोळी झाडून घटनास्थळावरून पळ काढला.

( हेही वाचा: चीनमधील टाळेबंदीमुळे यंदा छत्र्या महाग; जाणून घ्या नवे दर )

काश्मिरी पंडित महिला शिक्षिकेवर गोळीबार 

तसेच, 30 मे रोजी कुलगाममधील गोपालपोरा येथे दहशतवाद्यांनी एका हिंदू महिला काश्मिरी पंडित हिच्यावर गोळ्या झाडून हत्या केली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.