वीज पुरवठा खंडीत झाल्याने व्हेंटिलेटरवरील रुग्णाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना कोल्हापुरात घडली आहे. आमेश काळे असे मृत रुग्णाचे नाव आहे. महावितरणच्या अधिकारी कर्मचा-यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी संतप्त नातेवाईकांनी भरदिवसा रुग्णालयाच्या आवारात ठिय्या आंदोलन केले.
आमेश काळे या रुग्णाला फुफ्फुसाचा आजार होता. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून त्याच्यावर घरी उपचार सुरु होते. वीजबिल थकीत असल्याने, 30 मे रोजी आमिशच्या घरचा वीजपुरवठा महावितरणने खंडीत केला होता. गेल्या दोन दिवसांपासून शेजा-यांकडून वीज घेऊन व्हेंटिलेटर सुरु होते, मात्र बुधवारी सांयकाळी सर्वच वीजपुरवठा खंडित झाल्याने व्हेंटिलेटर बंद झाले आणि आमेशचा मृत्यू झाला.
( हेही वाचा: महाराष्ट्राला मिळणार पहिली ‘वंदे भारत’ ट्रेन; आता मुंबई- पुणे प्रवास फक्त अडीच तासांत )
सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा
आमेश काळे 38 वर्षांचा होता. वीज पुरवठा खंडित झाल्याने आमेशचा मृत्यू झाल्याने काळे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला. गेल्या काही दिवसांपासून आमेशवर घरीच व्हेंटिलेटरवर उपचार सुरु होते. वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर, शेजारच्या घरातून विजेचे कनेक्शन देत व्हेंटिलेटर सुरु होते, पण अखेर वीजपुरवठा खंडित झाल्याने आमेशचा मृत्यू झाला. संतापलेल्या कुटुंबियांनी सीपीआर रुग्णालयासमोर केलेला आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता. महावितरणच्या भ्रष्ट अधिका-यांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी कुटुंबीयांकडून केली जात आहे.
Join Our WhatsApp Community