तुर्कस्तान या देशाने आपले नाव बदलले आहे. संयुक्त राष्ट्राकडे तुर्कस्तानने नावात बदल करण्याची विनंती केली होती. आता त्या नावाला मान्यता देण्यात आली आहे. गेल्या वर्षी तुर्कीचे अध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगान यांच्या रीब्रॅंडिंग मोहिमेअंतर्गत, अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांना देशाचे नाव बदलण्याची विनंती केली होती. त्यामुळे आता तुर्की हा देश ‘तुर्किये’ या नावाने ओळखला जाईल.
( हेही वाचा: चीनमधील टाळेबंदीमुळे यंदा छत्र्या महाग; जाणून घ्या नवे दर )
..म्हणून बदलले नाव
एका नवीन ब्रॅंड नावासह देशाला जगात प्रस्थापित करण्याचा आणि टर्की या शब्दाशी संबंधित काही नकारात्मक प्रतिमा दूर करण्याचा प्रयत्न म्हणून पाहिले जात आहे. तुर्कीचे अध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगान यांचे सरकार ब-याच काळापासून तुर्कीचे आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त नाव बदलून तुर्किये करण्याचा प्रयत्न करत होते. कारण हा शब्द तुर्कीच्या स्पेलिंग आणि उच्चाराशी मिळतो. तसेत 1923 मध्ये तुर्कीच्या स्वातंत्र्याची घोषणा झाल्यापासून येथील रहिवासी तुर्की असा उच्चार करत आहेत.