स्थानिक स्वराज्य सस्थांसह अनेक निवडणुकांचे वेध राज्याला लागले आहेत. अशा परिस्थितीत राज्यातील कोरोनाचा संसर्ग देखील अचानक वाढू लागल्याचे दिसतेय. गुरूवारी मुख्यमंत्र्यांनी कोविड टास्क फोर्ससोबत महत्त्वाची बैठक घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना निर्बंध नको असतील, तर मास्क वापरा असे आवाहन केले. तर या पार्श्वभूमीवर राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी निवडणुकांबद्दल काही संकेत दिले आहेत.
काय म्हणाले विजय वडेट्टीवार
पुढील ८ ते १० दिवस महत्त्वाचे आहेत. या दिवसांमध्ये कोरोना रुग्णसंख्या किती वाढतेय याचा आढावा घेतला जाईल. काय परिस्थिती निर्माण होईल, त्यावर निर्णय घेतला जाईल. येणाऱ्या निवडणुकीला बराच वेळ आहे. ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये कार्यक्रम ठरेल. पण कोरोना परिस्थिती गंभीर झाली झाली तर निवडणुका पुढे ढकलण्याची विनंती निवडणूक आयोगाला करावी लागेल, असे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हंटले आहे.
(हेही वाचा – हिंदूंना बंदुका चालवण्याचं प्रशिक्षण सरकारने द्यावं; मनसेची मागणी)
पुढे ते असेही म्हणाले की, निवडणुकीच्या माध्यमातून लोकांची गर्दी होईल, त्यामुळे पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढेल यामुळे निवडणुका टाळता येईल का याचा विचार होईल. आमच्या बाजूने आम्ही विनंती करू पण निवडणुका घ्यायच्या की नाही, हे ठरविण्याचा निर्णय निवडणूक आयोगालाच आहे. असेही वडेट्टीवार म्हणाले. वडेट्टीवारांच्या या विधानानंतर आता राज्यातील निवडणुका वेळेवर होणार आहे का, अशी शंका निवडणुकांवर उपस्थित केली जात आहे.
Join Our WhatsApp Community