भाजपने राज्यसभा निवडणुकीसाठी तिसरा उमेदवार दिल्याने आता ही निवडणूक चांगलीच चुरशीची झाली आहे. पण आता मविआकडून भाजपला एक ऑफर देण्यात आली आहे. राज्यसभा निवडणूक बिनविरोध करा, आम्ही तुम्हाला विधान परिषदेत एक जागा जास्त देू, अशी ऑफर मविआकडून देण्यात आली आहे.
पण आता यावरुनच मविआतील काँग्रेस आणि राष्ट्रवादीत नाराजी असल्याची माहिती मिळत आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी विधान परिषदेच्या दोन्ही जागा लढवण्यावर ठाम असल्याचे आता बोलले जात आहे. त्यामुळे आता यावरुन महाविकास आघाडीमध्येच मतभेद असल्याची चर्चा होत आहे.
(हेही वाचाः राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी सकारात्मक चर्चा; कोण घेणार माघार?)
काँग्रेस-राष्ट्रवादी ठाम
राज्यसभा निवडणूक बिनविरोध करण्यासाठी मंत्री शुक्रवारी मविआ आणि भाजपच्या नेत्यांमध्ये चर्चा झाली. यावेळी राज्यसभा निवडणूकीतून भाजपने तिसरा उमेदवार मागे घेतल्यास, विधान परिषदेला एक जागा आणखी देऊ असा प्रस्ताव मविआकडून भाजपला देण्यात आला आहे. पण विधान परिषदेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष आपल्या दोन्ही जागा लढवण्यावर ठाम असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
शिवसेनेने उमेदवार मागे घ्यावा
इतकेच नाही तर शिवसेना राज्यसभेसाठी दोन जागा लढवणार असल्याने शिवसेनेने आपला विधान परिषदेतील उमेदवार मागे घ्यावा, असे काँग्रेस-राष्ट्रवादीचे म्हणणे असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे लवकरच याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.
(हेही वाचाः हिंदूंना बंदुका चालवण्याचं प्रशिक्षण सरकारने द्यावं; मनसेची मागणी)
20 जून रोजी होणार मतदान
या निवडणुकांसाठी 2 जून रोजी अधिसूचना जारी करण्यात येणार आहे. 9 जूनपासून अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार असून, 20 जून रोजी मतदान होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून ही निवडणूक घेण्यात येणार आहे.
Join Our WhatsApp Community