Indian bank SO Recruitment 2022 : इंडियन बॅंकेत 300 हून अधिक पदांची भरती; असा करा अर्ज

141

बॅंकेत नोकरी करण्यास इच्छूक असणा-या उमेदवारांना इंडियन बॅंकेत नोकरी करण्याची संधी आहे. स्पेशालिस्ट ऑफिसरच्या पदांसाठी रिक्त जागांवर भरती जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवार अधिकृत साइट indianbank.in द्वारे या पदांसाठी अर्ज करु शकतात. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जून 2022 आहे.

रिक्त जागा

इंडियन बॅंकेतील भरती मोहिमेद्वारे विशेषज्ञ अधिका-यांच्या 312 पदांची भरती केली जाणार आहे.

वयोमर्यादा

इंडियन बॅंकेतील भरतीअंतर्गत बंपर पदांची भरती केली जाणार आहे. या भरतीअंतर्गत काही पदांसाठी अर्ज करण्याचे कमाल वय 30 वर्षे, काहींसाठी 35 वर्ष तर काहींसाठी 38 वर्ष आणि 40 निश्चित करण्यात आले आहे.

( हेही वाचा: पाकिटात ११ किंवा १००१ असेच का दिले जातात? ही आहेत त्या वरच्या 1 रुपयामागची कारणे )

असा करा अर्ज

  • indianbank.in ला भेट द्या.
  • होम पेजवर दिलेल्या करिअर विभागात जा.
  • आता येथे स्पेशलिस्ट ऑफिसर्स 2022 च्या भर्तीच्या लिंकवर क्लिक करा.
  • नोंदणीसाठी या लिंकवर क्लिक करा.
  • आता उमेदवाराचा मेल आयडी टाकून नोंदणी करा.
  • त्यांनतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • आता अर्जाची फी भरा.
  • शेवटी सबमिट वर क्लिक करा.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.