SBI च्या ‘या’ सेवांसाठी तुम्ही पैसे तर देत नाही ना? ATM मधून फ्रीमध्ये करा ही कामे

206

सार्वजनिक क्षेत्रातील देशातील सर्वात मोठी बँक म्हणून स्टेट बँक ऑफ इंडियाला ओळखले जाते. स्टेट बँक ऑफ इंडिया अर्थात SBI आपल्या ग्राहकांच्या हिताचा विचार करून नेहमीच त्यांना सतर्क करत असते. SBI चे ग्राहक स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएमवर अनेक प्रकारच्या सेवा फ्रीमध्ये घेऊ शकतात. SBI च्या वेबसाइटनुसार, देशात 60 हजारांहून अधिक एटीएम असून जे भारतातील सर्वात मोठे एटीएम नेटवर्क मानले जात आहे. कोणताही ग्राहक SBI ATM (डेबिट कार्ड) वापरून अनेक प्रकारच्या मोफत सेवांचा लाभ घेऊ शकतो. तसेच सर्व प्रकारची SBIचे कार्डे बँकेच्या ATM मध्ये स्वीकारली जातात, असे SBI ने सांगितले आहे.

SBI च्या ATM मध्ये या सेवा मिळणार मोफत

SBI डेबिट कार्ड वापर करून तुम्हाला झटपट मनी ट्रान्सफर करता येणार आहे. ही सेवा पूर्णपणे मोफत असून याद्वारे तुम्ही कोणालाही पैसे ट्रान्सफर करू शकता. यासाठी तुम्हाला तुमचे एसबीआय डेबिट कार्ड, पिन नंबर आणि तुम्ही ज्याला पाठवत आहात त्या व्यक्तीच्या डेबिट कार्डचा नंबर तुमच्याकडे असणे आवश्यक आहे.

(हेही वाचा – SBI ग्राहकांना सरकारचा इशारा, ‘हा’ मेसेज त्वरीत डिलीट करा; अन्यथा…)

सहज बदला पिन

तुम्ही SBI च्या ATM ला भेट देऊन तुमच्या डेबिट कार्डचा पिन फ्रीमध्ये बदलू शकता. तुम्ही तुमच्या एटीएम कार्डचा पासवर्ड नियमितपणे बदलण्यासाठी या सेवेचा लाभ घेऊ शकता. यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचे शुल्क भरावे लागणार नाही.

अकाऊंटमध्ये किती बॅलेन्स आहे?

तुम्ही SBI च्या ATM चा वापरून तुमच्या अकाऊंटची माहिती मिळवू शकता. मिनी स्टेटमेंट सेवेचा वापर करून, तुम्ही तुमच्या अकाऊंटमधील केलेल्या व्यवहारांचा आढावा सहज ठेवू शकता.

या सुविधाही आहेत मोफत उपलब्ध

  • कोणतेही SBI बँकेच्या ATM चा वापर करून SBI Life Premium भरू शकता. यासाठी तुम्हाला बँकेत जाण्याची गरज नाही.
  • तुम्ही SBI च्या ATM चा वापर करून चेक बुकसाठी विनंती करू शकता. यासाठी तुम्हाला बँकेत जाण्याचीही गरज नाही किंवा तुम्हाला कोणताही फॉर्म भरण्याची गरज नाही.
  • SBI डेबिट कार्ड वापरून तुम्ही ATM मधून सर्व प्रकारची बिले सहज भरू शकता. यासाठी तुम्हाला कोणतेही अतिरिक्त शुल्क भरावे लागणार नाही.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.