शिवराज्याभिषेकासाठी सोलापुरातून जाणार ५ हजार मावळे!

123

अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या वतीने ५ व ६ जून रोजी दुर्गराज रायगडावर युवराज संभाजी छत्रपती महाराज व युवराज कुमार शहाजीराजे छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थित शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होत आहे.  यंदा ‘धार तलवारीची युद्ध कला महाराष्ट्राची’ , ‘जागर शिवशाहीचा, स्वराज्याच्या इतिहासाचा’ व “सोहळा पालखीचा स्वराज्याच्या ऐक्याचा’ हे कार्यक्रम शिवराज्याभिषेक महोत्सवाचे आकर्षण बिंदू असतील या सोहळ्यास शिवभक्तांनी उपस्थित रहावे, असे आवाहन समितीतर्फे केले आहे. सोलापुरातून पाच हजार मावळे जाणार आहेत.

लोकशाहीच्या तत्त्वावर स्वराज्याची उभारणी

छत्रपती शिवरायांनी सुमारे साडेतीनशे वर्षापूर्वी लोकशाहीच्या तत्त्वावर स्वराज्याची उभारणी केली. अठरा आलुतेदार, बारा बलुतेदारांना सोबत घेऊन स्वराज्यात ऐक्य घडवले. छत्रपती शिवरायांचा ६ जून १६७४ ला राज्याभिषेक झाला. स्वराज्याला छत्रपती मिळाले. महाराष्ट्रासह देशभरात ही घटना इतिहासात सुवर्णाक्षराने नोंद घेणारी ठरली. हा दिवस म्हणजे खऱ्या अर्थाने भारताचा पहिला स्वातंत्र्यदिन. तो राष्ट्रीय सण म्हणून साजरा होण्यासाठी अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती कार्यरत आहे. राज्याभिषेकाच्या स्मृती चिरंतन राहाव्यात. यासाठी समितीतर्फे राज्याभिषेक सोहळा दिमाखात साजरा होतो.

(हेही वाचा- वडेट्टीवार म्हणाले, … तर निवडणुका पुढे ढकलण्याची विनंती आयोगाला करावी लागेल)

सांस्कृतिक, पारंपरिक लोककलांचा होणार जागर

मिळालेल्या माहितीनुसार, यंदा पाच जूनला सायंकाळी ५ वा. ‘धार तलवारीची युद्ध कला महाराष्ट्राची’ हा शिवकालीन युध्द कला प्रात्यक्षिकाचा कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी राज दरबार येथे जागर शिवशाहीचा, स्वराज्याच्या इतिहासाचा हा शाहिरी कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात महाराष्ट्रातील शाहीर यांनी सहभाग घ्यावा. दि ६ जूनला मेघडंबरीतील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला सुवर्ण नाण्यांचा अभिषेक झाल्यानंतर सोहळा पालखीचा, स्वराज्याच्या ऐक्याचा या पालखी मिरवणुकीत महाराष्ट्रातील बारा बुलतेदार,अठरा आलुतेदार सर्व धर्मातील लोक सहभागी होणार आहेत. आपापल्या सांस्कृतिक पारंपरिक लोककलांचा मिरवणुकीत जागर होईल. राजसदर, नगारखाना, होळीचा माळ, बाजारपेठ ते जगदीश्वर मंदिर असा पालखी सोहळ्याचा मार्ग असेल.या मार्गावरून पालखीवर पुष्पवृष्टी केली जाणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.