सध्या राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी निवडणूक होणार हे निश्चित झाले आहे. कारण शुक्रवार, ३ जून २०२२ रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख होती, त्यादरम्यान महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या समोर प्रस्ताव ठेवला होता. त्यामध्ये भाजपने सहावी जागा सोडावी, विधान परिषदेसाठी महाविकास आघाडी भाजपासाठी पाचवी जागा सोडेल, असा तो प्रस्ताव होता, मात्र फडणवीस यांनी हा प्रस्ताव नाकारला, त्यामुळे अखेरीस राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी निवडणूक होणार हे निश्चित झाले आहे.
सध्याचे विधान सभेतील पक्षीय बलाबल
- भाजप – १०५
- शिवसेना – ५६
- राष्ट्रवादी – ५४
- काँग्रेस – ४४
- बहुजन विकास आघाडी -३
- एमआयम – २
- समाजवादी पार्टी – २
- प्रहार – २
- माकप – १
- मनसे – १
- भाकप – १
- स्वाभिमान पक्ष – १
- जन सुराज्य शक्ती – १
- शेकाप – १
- रासप – १
- अपेक्ष – १३
(हेही वाचा रशिया-युक्रेन युद्धाची शंभरी! जागतिक मंदीने वाढली बेकारी! भारतावरही परिणाम)
महाविकास आघाडी
- शिवसेना – ५६
- राष्ट्रवादी – ५४
- काँग्रेस – ४४
एकूण मते – १५४
शिवसेना उमेदवार – संजय पवार
इतर पक्ष आणि अपक्ष
- बहुजन विकास आघाडी – ३
- एमआयम -२
- समाजवादी पार्टी – २
- प्रहार – २
- माकप – १
- भाकप – १
- शेकाप – १
- जन सुराज्य पक्ष – १
- स्वाभिमान पक्ष – १
- रासप – १
- अपक्ष – १४
एकूण मते – ३१
भाजप – १०५
भाजपचा तिसरा उमेदवार – धनंजय महाडिक
Join Our WhatsApp Community