राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे नेहमीच आपल्या बेधडक विधानांसाठी प्रसिद्ध आहेत. काही वर्षांपूर्वी राज्यातील पाणी प्रश्नावर बोलताना अजित पवार यांची जीभ घसरली होती. त्यावेळी अजित पवार टीकेचे धनी झाले होते. त्याच विधानाची आठवण सांगत अजित पवारांनी एक विधान केलं आहे. पिंपरी-चिंचवड येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.
काय म्हणाले अजित पवार?
हल्ली मी बोलताना दहा वेळेस विचार करुन बोलतो. मागे एकदा चुकलो होतो तेव्हा सकाळी 7 ते रात्री 7 असे 12 तास यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी, आता नाही चुकायचं, नाही चुकायचं असं म्हणत बसलो होतो. तेव्हापासून मी एकदाही चुकलो नाही. बोलताना टाळ्या येऊ लागल्या की हळूहळू घसरायला होतं. पण त्याचवेळी मी माझ्या दुस-या मनाला सांगतो की घसरायचं नाही. त्यामुळे तुम्ही कितीही टाळ्या वाजवून मला खूश करण्याचा प्रयत्न केलात तरी मी घसरणार नाही, असं अजित पवार म्हणाले.
(हेही वाचाः तुम्ही वर्षावर या! मुख्यमंत्र्यांचे अपक्ष आमदारांना निमंत्रण)
…तर अजित पवार नाव सांगणार नाही
या कार्यक्रमात अजित पवारांनी पिंपरी-चिंचवड शहरातील पाण्याच्या प्रश्नावरही भाष्य केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून द्या, नाही तुम्हाला रोज पाणी प्यायला दिलं तर नाव अजित पवार सांगणार नाही. मी काही जादू करणार नाही. तुम्हाला 267 एमएलडी पाणी दोन धरणांतून देण्यात आलं आहे ते पाहोचवण्याचं काम आम्ही करणार आहोत, असा विश्वास अजित पवार यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
(हेही वाचाः राज्यसभेचा रणसंग्राम होणारच! मविआची ऑफर भाजपने धुडकावली)
Join Our WhatsApp Community