राज्यभरात शुक्रवारी एक हजारांहून अधिक रुग्ण आढळले. सलग तिसऱ्या दिवशी राज्यातील रूग्णसंख्या हजारीपार गेली आहे. गुरुवारच्या नोंदीत राज्यात १ हजार ४५ नवे रुग्ण आढळले असून ५१७ रुग्णांना डिस्चार्ज दिला गेला. हा वेग असाच सुरु राहिला तर रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात दर तीन-चार दिवसांनी थोडी घट दिसेल, अशी भीती आरोग्य विभागाच्या अधिका-यांनी व्यक्त केली.
मुंबई, ठाणे, पुण्यात रुग्णसंख्या वाढली
शुक्रवारी राज्यात ३ रुग्णांचा मृत्यू झाला. दिवसभरातील नव्या कोरोना रुग्णांच्या यादीत मुंबईत ७६३, ठाण्यात ५, पुण्यात ७९ नव्या रुग्णांची नोंद झाली. तिन्ही शहरांत सातत्याने सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. मुंबईत सद्यस्थितीत ३ हजार ७३५, ठाण्यात ६५८, पुण्यात ४०९ कोरोना रुग्णांना उपचार दिले जात आहेत. या तीन शहारांखालोखाल रायगडातील रुग्णसंख्येनेही शंभरीचा आकडा पार केला. रायगडात आता १०८ कोरोना सक्रीय रुग्णांची संख्या आहे. दर दिवसाला हजारीपार रुग्णसंख्या आढळली तर लवकरच आकडेवारी पुन्हा १० हजारांचा आकडा पार करेल, अशी भीतीही आरोग्य विभागाने व्यक्त केली. आता राज्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या ५ हजार १२७ असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
(हेही वाचा नामकरणातही आघाडीधर्म! कष्टक-यांच्या बीडीडी चाळींना गांधी, ठाकरे, पवार यांची नावे)
Join Our WhatsApp Community