पॅन कार्ड आधारला लिंक नाही? १ जुलैपासून भरावा लागेल इतका दंड, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया!

146

आधार कार्ड (Aadhaar Card) पॅन कार्डला ( Pan Card) लिंक असणे हे बंधनकारक करण्यात आले आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेजकडून आधारला पॅन लिंक करण्यासाठी ३१ मार्च २०२२ पर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र सीबीडीटीद्वारे जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार आता तुम्ही आधार-पॅन लिंक केले नसेल तर तुम्हाला दंड आकारला जाणार आहे.

( हेही वाचा : आधार कार्डवर मराठीत अपडेट करा तुमची माहिती! जाणून घ्या प्रक्रिया)

एखाद्या व्यक्तीने जर ३० जून २०२२च्या पूर्वी आधार-पॅन लिंक केले तर तुम्हाला ५०० रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे आणि तुम्ही ३० जून २०२२ नंतर आधारला पॅन लिंक केले तर तुम्हाला १००० रुपयांचा दंड भरावा लागणार आहे.

सीबीडीटीकडून आधारला पॅन लिंक करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च २०२३ पर्यंत वाढवण्यात आहे. परंतु आता ३० जून २०२२ नंतर लिंक केल्यास तुम्हाला वाढीव दंड भरावा लागणार आहे.

आधार – पॅन लिंक केले नाही तर काय होईल?

तुम्ही तुमचे पॅन कार्ड आधारला लिंक केले नाही तर तुमचे पॅन निष्क्रिय होऊ शकते. पॅन कार्ड निष्क्रिय झाल्यास तुम्हाला अनेक समस्या येऊ शकतात, कारण भारतात सर्वच आर्थिक व्यवहारांमध्ये पॅन कार्डची आवश्यकता असते. बॅंकेचे खाते ओपन करण्यासाठी, इनकम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी तुमच्याकडे पॅन कार्ड असणे आवश्यक आहे. त्यामुळे तुमचे पॅन कार्ड निष्क्रिय झाल्यास तुम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे लवकरात लवकर आधारला पॅन लिंक करा असे आवाहन सीबीडीटीच्या वतीने करण्यात आले आहे.

आधार – पॅन लिंक करण्यासाठी काय कराल?

  • लिंक करण्यासाठी www.incometax.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या. त्यानंतर quick लिंक सेक्शनमध्ये आधार ऑप्शनवर जा. त्यावर क्लिक केल्यानंतर नवी विंडो ओपन होईल. तुम्ही तुमच्या पॅन, आधारसोबत नाव आणि मोबाईल नंबरची माहिती द्या.
  • सर्व माहिती भरल्यावर I Validate My Aadhaar Details ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर registered mobile number वर OTP येईल, तो ओटीपी टाकून व्हॅलिडेटवर क्लिक करा त्यानंतर तुम्हाला दंड भरावा लागेल आणि आधार-पॅन लिंकची प्रक्रिया पूर्ण होईल.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.