जे.जे स्कूल ऑफ आर्टस आणि जे.जे. फाईन आर्टस परिसरातील चित्राकरणाच्या दरात पाचपट वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे या महाविद्यालयांच्या परिसरातील उद्याने आणि ब्रिटिशकालीन ऐतिहासिक वास्तूंच्या पार्श्वभूमीवर लघुपट किंवा चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी निर्मात्यांना अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत. उच्च व तंत्र शिक्षण विभागाने याबाबतचा शासन निर्णय शुक्रवारी जारी केला आहे.
असे असतील नवे दर
24 तासांसाठी पाच लाख
12 तासांसाठी अडीच लाख
दहा वर्षांनंतर भाड्यात वाढ
सध्या हा दर अनुक्रमे एक लाख आणि पन्नास हजार इतका आहे. दहा वर्षांत चित्रीकरणासाठीच्या भाड्यात वाढ केली नव्हती. यासोबतच ऐनवेळी चित्रीकरणाचा कालावधी वाढल्यास वाढीव कालावधीसाठी ताशी 25 हजार मोजावे लागणार आहेत. शिवाय, चित्रीकरणासाठी मान्य केलेला कालावधी बदलण्यासाठा सुद्धा तीन लाख रुपये अतिरिक्त भरावे लागतील, असे या जीआरमध्ये नमूद करण्यात आले आहे.
( हेही वाचा: सावधान: चहामध्ये कीटकनाशके आणि रसायने )
डे पाच दिवस आधी भरावे लागणार
सध्याचे दर दहा वर्षांपूर्वी निश्चित केले होते. सात दिवस किंवा त्यापेक्षा कमी कालावधीसाठी आता चित्रीकरणाच्या 15 दिवस आधी अर्ज करावा तर सात दिवसांपेक्षा अधिक काळासाठी चित्राकरण करायचे असेल तरच दोन महिन्यांआधी अर्ज करावा लागणार आहे. तर, चित्राकरणासाठीची भाड्याची रक्कम पाच दिवस आधी भरावी लागणार आहे.
Join Our WhatsApp Community