हिंदवी स्वराज्यसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा ३४९ वा राज्याभिषेक दिन जेष्ठ शुद्ध त्रयोदशीस येत आहे. या वर्षी जेष्ठ शुद्ध त्रयोदशीला फिरंगी दिनांक १२ जून २०२२ रोजी येत आहे. जेष्ठ शुद्ध द्वादशी पासून म्हणजे ११ जून पासून पारंपरिक पद्धतीने वेद मंत्रघोषात राज्याभिषेक किल्ले रायगडावर संपन्न होणार आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या तमाम शिवभक्तांसाठी श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समितीतर्फे सोहळा आयोजित करण्यात आल्याची माहिती पत्रकार परिषदेत श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समितीचे अध्यक्ष सुनिल पवार यांनी दिली.
महाराष्ट्राच्यादृष्टीने अत्यंत स्वाभिमानाची गोष्ट
शिवरायांचा राज्याभिषेक दिन म्हणजे अखंड भारताच्या इतिहासातील सुवर्ण दिन आहे. सार्वभौम हिंदवी स्वराज्याची प्रतिष्ठापना झाली तो हा सुवर्ण दिवस. असा दिवस महाराष्ट्राने कधीच पाहिला नव्हता आणि पाहिला नाही म्हणून त्या सुवर्ण क्षणाचे स्मरण कायम रहावे, म्हणून हा सोहळा त्याच दिवशी त्याच स्थळी म्हणजेच जेष्ठ शुद्ध दुर्गराज रायगडावर शाही इतमामात साजरा केला जातो. दुर्गराज रायगड समितीने गेली २८ वर्ष श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती, दुर्गराज रायगड ही संस्था महाराष्ट्रातील सुमारे ६० संस्थांना घेऊन समितीचे कार्यकर्ते आणि असंख्य शिवभक्त ऊन्हा -पावसाची पर्वा न करता एकत्र येऊन राज्याभिषेक सोहळा साजरा करतात. ही महाराष्ट्राच्यादृष्टीने अत्यंत स्वाभिमानाची गोष्ट आहे.
असा सुरु झाला राज्याभिषेक शक
साडेतीनशे वर्षांपूर्वी शिवरायांनी परकीय धर्मांध आक्रमक शत्रूविरुद्ध सशस्त्र उठाव करून जनतेला जागृत करून स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. मनामनात स्वातंत्र्याची ज्योत पेटवली. महाराजांनी हिंदवी स्वराज्याचे सुवर्ण सिंहासन रायगडावर स्थापन करून स्वतःचा राज्याभिषेक करून शालिवाहन शके १५९६ जेष्ठ शुद्ध त्रयोदशी आनंदनाम संवत्सर या दिवसापासून राज्याभिषेक शक चालू केला, म्हणून जेष्ठ शुद्ध त्रयोदशी हाच खरा हिंदू साम्राज्य दिन आहे. अखंड भारताच्यादृष्टीने ही अलौकिक घटना होती, असे दुर्गराज रायगड समितीचे अध्यक्ष सुनिल पवार म्हणाले.
तरुण पिढीपर्यंत पोहचवण्याचे काम
छत्रपती शिवरायांनी स्वधर्म, स्वराज्य आणि स्वभाषा यांसाठी आपले संपूर्ण आयुष्य पणाला लावले. स्वराज्य रक्षणासाठी गडकिल्ले, पायदळ, घोडदळ आणि आरमार उभारले आणि देदीप्यमान इतिहास घडवला. हा महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास तरुण पिढीपर्यंत पोहचवण्याचे काम गेली अनेक वर्ष राज्याभिषेक समिती करत आहे. जात, पात, प्रांत, धर्म यांना एकत्र घेऊन ही समिती कार्यरत आहे. शिवराज्याभिषेक हा लोकोत्सव आहे. कोणत्याही सुखसोयीची अपेक्षा न करता शिवरायांच्या दर्शनासाठी तिथीप्रमाणे या राज्याभिषेक सोहळ्याला येत असतात, असे समितीचे अध्यक्ष पवार यांनी सांगितले.
( हेही वाचा: येत्या मंगळवार, बुधवारी शहरात १०० टक्के पाणीकपात )
कार्यक्रम रुपरेषा
जेष्ठ शुद्ध द्वादशी ( शनिवार, दिनांक 11 जून, 2022)
- सकाळी 8 वाजता श्री गडदेवता शिर्काईपूजन (श्रीशिर्काई मंदिर)
- सकाळी 10 वाजता श्री छत्रपति शंभू महाराज जयंती उत्सव ( राजसदर)
- सकाळी 11 वाजता श्री व्याडेश्वर पूजन (श्री व्याडेश्वर मंदिर)
- दुपारी 12 वाजता श्रीगणेशपूजन, श्रीजगदीश्वर पूजन (श्री जगदीश्वर प्रसन्न)
- सायंकाळी 5 वाजता श्रीशिवतुलादान विधी ( राजसदर)
- रात्री 9 वाजता सांस्कृतिक कार्यक्रम (राजसदर)
जेष्ठ शुद्ध त्रयोदशी, श्री शिवराज्याभिषेक दिन ( रविवार दिनांक. 12 जून 2022)
पहाटे 5:30 वाजता ध्वजारोहण सोहळा (नगारखाना)
पहाटे 6 वाजता श्रीशिवप्रतिमापूजन, अभिषेक व सिंहासनारोहण ( राजसदर)
सकाळी 8 वाजता श्री पालखी मिरवणूक (होळीचा माळ, श्रीजगदीश्वर प्रसाद)
सकाळी 10 वाजता महाआरती ( श्री जगदीश्वर प्रसाद)
सकाळी 11 वाजता महाप्रसाद व सांगता ( जिल्हापरिषद सभागृह)
राज्याभिषेक सोहळ्याचे व्यवस्थापन
१. रायगडावरील येण्या जाण्याचे मार्ग (गाडी मार्ग)
२. माडी पार्किंग व्यवस्था (पोलिस यांच्या मार्गदर्शनाने)
३. गडावर येण्याचे मार्ग
● पायवाट चितदरवजा किवहा नाणे दरवाजा
• रोपवे ( रोपवे व्यवस्थापकांच्या मार्गदर्शनाने) तिकीट दर रु. २२५ प्रत्येकी (समितीच्या विनंती वरून सवलतित)
४. दि. 11 व 12 जून 2022 दोन दिवस चहा, नाश्ता व जेवण समितितर्फे देण्यात येईल.
५. वैद्यकीय सेवा, अतिदक्षता विभाग इ.
Join Our WhatsApp Community