राज्यात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क सक्तीचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आरोग्य सचिव प्रदीप व्यास यांच्या सूचनेनुसार, माॅल्स, थिएटर्स, रेल्वे स्थानक, बंदिस्त ठिकाणी, शाळा, काॅलेज तसेच, प्रवासादरम्यान मास्क बंधनकारक करण्यात आले आहे.
काही दिवसांपूर्वी झालेल्या टास्क फोर्सच्या बैठकीनंतर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी येत्या पंधरा दिवसांत मास्कसक्तीबाबत निर्णय घेतला जाईल, असे सांगितले होते. मात्र वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सचिव यांनी काही ठिकाणी मास्क बंधनकारक केले आहे.
( हेही वाचा: कोविड लसीकरण गतिमान करण्यासाठी ३१ जुलैपर्यंत ‘हर घर दस्तक’ मोहीम! )
काय म्हणाले आरोग्यमंत्री राजेश टोपे
- राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे हाॅटस्पाॅट तयार झाले आहेत . त्या पार्श्वभूमीवर हा निर्यण घेण्यात आला आहे.
- टास्क फोर्सच्या बैठकीत निर्णय; बंदिस्त ठिकाणी मास्क वापरण्याचे आवाहन.
- 100 टक्के मास्क सक्ती अद्याप नाही.
- लसीकरण करा, तसेच बूस्टर डोस घेण्याचे आवाहन
कुठे- कुठे मास्क बंधनकारक
- सार्वजनिक वाहतुकीची ठिकाण
- शाळा
- काॅलेज
- बंदीस्त सभागृह
- गर्दीची ठिकाणे
- रेल्वे
- बस
- सिनेमागृहे
- रुग्णालये
- हाॅटेल
मागच्या काही दिवसात राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनास्थिती पाहता खबरदारीचा उपाय म्हणून राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.
Join Our WhatsApp Community