टेस्लाच्या 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकणार; इलाॅन मस्क

161

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाचे सीईओ इलाॅन मस्क कर्मचारी कपात करण्याच्या तयारीत आहेत. सध्या अर्थव्यवस्थेबद्दल अतिशय वाईट भावना असून, किमान 10 टक्के कर्मचारी कमी करावे लागतील, असे मस्क यांनी म्हटले आहे.

यासंबंधित ई-मेल टेस्लाच्या अधिका-यांना गुरुवारी पाठवण्यात आला असून, जगभरातील नवीन लोकांना नोकरीवर घेण्याची प्रक्रिया थांबवा. अर्थव्यवस्थेबद्दल अतिशय वाईट मत तयार झाले आहे, असे त्यात म्हटले आहे. मंगळवारी मस्क यांनी कर्मचा-यांना इशारा दिला होता की, जे कामावर येणार नाहीत त्यांनी टेस्लाचे काम करणे सोडावे. प्रत्येक कर्मचा-याने आठवड्यात किमान 40 तास काम करणे आवश्यक आहे.

( हेही वाचा :मोठी बातमी: राज्यात पुन्हा मास्क बंधनकारक )

ऑस्ट्रेलियाच्या उद्योगपतीची कर्मचा-यांना ऑफर

टेस्लाचे सीईओ मस्क आणि ऑस्ट्रेलियाचे अब्जाधिश ट्विटरवर भिडले. प्रत्येकाला 40 तास काम करावे लागेल, असे मस्क यांनी आदेशात म्हटले होते. यावर ‘1950 च्या दशकाप्रमाणे आदेश’ असे म्हणत उद्योगपती स्काॅट फरक्कर यांनी मस्क यांनी टोमणा मारला. तसेच, त्यांनी यावेळी टेस्लाच्या कर्मचा-यांना माझ्या कंपनीमध्ये नोकरी करावी, अशी ऑफरही दिली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.